Team India WTC Final 
IPL

Team India WTC Final: रहाणे इन... सूर्या आऊट! फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच

Kiran Mahanavar

Team India WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. जगातील टॉप-2 संघांमधील हा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सात जूनपासून खेळल्या जाणार आहे. या ब्लॉकबस्टर अंतिम सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत भारतीय चाहते आपल्या संघाची निवड होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असेल, तर शुभमन गिल आणि केएल राहुल हे उर्वरित दोन सलामीवीर असतील. स्टार फलंदाज विराट कोहली आणि भरवशाचा खेळाडू चेतेश्वर पुजार मधल्या फळीला मजबूत करतील. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या अंतिम सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नसल्यामुळे निवड समिती अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला प्राधान्य देऊ शकतात. रहाणेला गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेनंतर कसोटी संघातून वगळण्यात आले होते.

अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या मोसमात खूप धावा केल्या आणि आयपीएल 2023 मध्ये त्याचा फॉर्म अप्रतिम आहे. यासोबतच त्याचा इंग्लिश परिस्थितीतील अनुभव संघासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. वृत्तानुसार निवडकर्त्यांनी रहाणेला आयपीएलदरम्यान लाल चेंडूने सराव करण्यास सांगितले आहे. रहाणे संघात राहिल्यास सूर्यकुमार यादवला संघातून वगळावे लागू शकते. असो सूर्याला कसोटी क्रिकेटचा तेवढा अनुभवही नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टिरक्षक फलंदाज केएस भरतची कामगिरी काही खास नव्हती, मात्र या महत्त्वाच्या सामन्यासाठी त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इशान किशन बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संघात राहू शकतो. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचेही संघात स्थान निश्चित आहे. उमेश यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट हे वेगवान गोलंदाज संघात असतील.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT