Yashasvi Jaiswal | Rajasthan Royals | IPL 2024 Sakal
IPL

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालनं शतक तर केलंच, पण IPL मध्ये 'हा' कारनामा करणाराही बनला पहिलाच फलंदाज

Yashasvi Jaiswal IPL Century: यशस्वी जैस्वालने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतकी खेळी करत आयपीएलमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Yashasvi Jaiswal IPL Century: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 38 व्या सामन्यात सोमवारी राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला. राजस्थानच्या या विजयात 22 वर्षीय यशस्वी जयस्वालने मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग राजस्थानने 18.4 षटकात 1 विकेट गमावत 183 धावा करून पूर्ण केला. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने नाबाद शतकी खेळी केली.

जैस्वालने 60 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 104 धावांची नाबाद खेळी केली. विशेष म्हणजे हे त्याचे आयपीएलमधील दुसरे शतक तर आहेत, पण मुंबई इंडियन्सविरुद्धचेही दुसरे शतक आहे. त्यामुळे त्याने एक खास पराक्रम केला आहे.

जैस्वाल आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध 2 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा सहावाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी केएल राहुल, ख्रिस गेल, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर आणि जॉस बटलर यांनी असा विक्रम केला आहे. बटलरने कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू अशा दोन संघांविरुद्ध हा पराक्रम कला आहे.

इतकेच नाही, तर जैस्वाल वयाची 23वर्षे पूर्ण करण्यापूर्वी आयपीएलमध्ये दोन शतके करणारा पहिलाच खेळाडूही ठरला आहे.

आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध 2 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारे क्रिकेटपटू

  • 3 शतके - केएल राहुल (विरुद्ध मुंबई इंडियन्स)

  • 2 शतके - ख्रिस गेल (विरुद्ध पंजाब किंग्स)

  • 2 शतके - विराट कोहली (विरुद्ध गुजरात लायन्स)

  • 2 शतके - डेव्हिड वॉर्नर (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स)

  • 2 शतके - जॉस बटलर (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स)

  • 2 शतके - जॉस बटलर (विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू)

  • 2 शतके - केएल राहुल (विरुद्ध मुंबई इंडियन्स)

राजस्थानचा विजय

राजस्थानकडून जैस्वालने शतक करताना आधी जॉट बटलरबरोबर 74 धावांची सलामी भागीदारी केली. बटलर 35 धावांवर बाद झाल्यानंतर संजू सॅमसनबरोबर 109 धावांची नाबाद भागीदारी केली. सॅमसनने नाबाद 38 धावा केल्या त्यामुळे राजस्थानने या सामन्यात सहज विजय मिळवला. मुंबईकडून एकमेव विकेट पीयुष चावलाने घेतली.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकात 9 बाद 179 धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने 45 चेंडूत 65 धावांची खेळी केली, तर नेहल वढेराने 24 चेंडूत 49 धावांची खेळी केली.

राजस्थानकडून गोलंदाजीत संदीप शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या, तर आवेश खान आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT