Yuvraj Singh on Abhishek Sharma IPL 2024 news sakal
IPL

IPL 2024 : 300+च्या स्ट्राइक रेटने धावा केल्यानंतरही अभिषेकच्या खेळीवर संतापला युवराज... ट्विट करून फटकारले

Yuvraj Singh on Abhishek Sharma : आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद संघाने फलंदाजीच्या आघाडीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Kiran Mahanavar

Yuvraj Singh on Abhishek Sharma IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद संघाने फलंदाजीच्या आघाडीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संघाकडून डावाची सुरुवात करणारा युवा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातही सनरायझर्स हैदराबाद संघासमोर 166 धावांचे लक्ष्य असताना अभिषेकने सुरुवातीलाच 300+च्या स्ट्राइक रेटने केवळ 12 चेंडूत 37 धावांची खेळी करत सामना एकतर्फी केला.

मात्र, अभिषेकच्या या शानदार खेळीनंतरही भारताचा माजी खेळाडू आणि सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगने त्याला आऊट होण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या डावात अभिषेक शर्माने दुसऱ्याच षटकात मुकेश चौधरीला 26 धावा ठोकल्या. मात्र, पुढच्याच षटकात दीपक चहरविरुद्ध खराब फटका खेळल्यामुळे त्याची विकेट गेली. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये अभिषेकला चांगली सुरुवात झाली आहे.

मात्र त्याचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करण्यात त्याला यश आलेले नाही. युवराज सिंगने याबद्दल ट्विट केले आणि X वर लिहिले की, तू चांगला खेळलास, पण पुन्हा एकदा तू चुकीचा शॉट खेळून आऊट झाला. या सामन्यातील शानदार खेळीबद्दल अभिषेकला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

अभिषेक शर्माशिवाय युवराज सिंगने या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या शिवम दुबेच्या कामगिरीचेही कौतुक केले, ज्याने 24 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 45 धावांची स्फोटक खेळी खेळली. या मोसमात दुबे आतापर्यंत याच शैलीत फलंदाजी करताना दिसला आहे. युवराज सिंगने शिवम दुबेबद्दल ट्विट करताना लिहिले की, मला वाटतं शिवम दुबे आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा भाग असावा कारण त्याच्यात खेळ बदलण्याची क्षमता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawr : रोहित तू थोडक्यात वाचलास.. वाकून नमस्कार करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांचा मिश्किल टोला

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत निवडणूक संचलन समितीची बैठक

Share Market Today: शेअर बाजारातील ट्रेंडमध्ये झाला बदल; आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT