Yuzvendra Chahal allegation New Zealand Former Player James Franklin Will Be question esakal
IPL

चहलचे हात-पाय बांधणाऱ्या फ्रँकलिनचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार?

सकाळ डिजिटल टीम

भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) काही दिवसांपूर्वी आस्ट्रेलियाचा माजी खेळाडी अँड्र्यु सायमंड (Andrew Symonds) आणि न्यूझीलंडचा माजी खेळाडू जेम्स फ्रँकलीन (James Franklin) यांच्यावर शारीरिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणी आता जेस्म फ्रँकलिनची चौकशी (Investigation) सुरू होणार आहे. जेम्स फ्रँकलिन सध्या डरहम काऊंटी क्रिकेट (Durham County Cricket Club) क्लबचा मुख्य प्रशिक्षक आहे. क्लबने युझवेंद्र चहलच्या आरोपांची वैयक्तिकरित्या चौकशी करणार असल्याचे सांगितले.

युझवेंद्र चहलने एका पॉडकास्टमध्ये अँड्र्यु सायमंड आणि जेम्स फ्रँकलिन यांनी दारूच्या नशेत त्याचे हात पाय बाधून त्याला रूममध्ये रात्रभर कोंडून ठेवले होते असा गौप्यस्फोट केला होता. यावेळी या दोघांनी त्याच्या तोंडाला चिकटपट्टी देखील लावली होती. ही घटना युझवेंद्र चहल मुंबई इंडियन्समध्ये असताना 2011 च्या दरम्यान घडली होती. दरम्यान या आरोपांच्या प्रकरणात आता डरहम काऊंटी क्रिकेटचे वक्तव्य समोर आले आहे. याबाबतची माहिती इएसपीएन क्रिकइन्फोने दिली आहे. या वक्तव्यात क्लब म्हणते की 'आम्हाला आताच 2011 च्या एका घटनेबद्दल माहिती मिळाली आहे. या प्रकरणात आमच्या एका कोचिंग स्टाफचे नाव आले आहे. आमच्या कर्मचाऱ्याबाबतच्या कोणत्याही मुद्द्यावर कल्ब सत्य जाणून घेण्यासाठी संबंधित व्यक्तींशी वैयक्तिकरित्या बोलणार आहे.'

जेम्स फ्रँकलिन हा 2011 ते 2013 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. त्यानंतर 2019 मध्ये डरहम काऊंटी क्रिकेट क्लबने त्याला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. दरम्यान युझवेंद्र चहलने चेन्नईमध्ये घडलेल्या घटनेवेळी सायमंड आणि फ्रँकलिन यांनी भरपूर 'फ्रूट ज्यूस' पिला होता असे सांगितले. त्यानंतर त्यांनी काय विचार करून माझे हात पाय बांधले हे माहिती नाही. मात्र त्यांनी मला आता हे हात पाय सोडून दाखव असे सांगितेले. ते इतक्या नशेत होते की त्यांनी माझ्या तोंडावर चिकटपट्टी देखील लावली होती. यानंतर पार्टी करण्याच्या नादात ते मला साफ विसरून गेले. चहल पुढे म्हणाला की सकाळी हॉटेल स्टाफने येऊन माझी सुटका केली. चहलने या खेळाडूंनी माझी कधी माफी मागितली नाही असेही सांगितले. युझवेंद्र चहल मुंबई इंडियन्समध्ये असताना 2013 मध्येही एक घटना झाली होती. त्यावेळी एका खेळाडूने दारूच्या नशेत चहलला 15 व्या मजल्यावरून खाली लटकवले होते असे चहल म्हणाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT