Yuzvendra Chahal RCB Retention  esakal
IPL

विषय पैशाचा नाही आरसीबीने विचारले देखील नाही : युझवेंद्र चहल

सकाळ डिजिटल टीम

एकाकाळी रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा हुकमी एक्का म्हणून ओळख निर्माण केलेला युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यंदाचा हंगाम राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळणार आहे. युझवेंद्रने जरी आयपीएल (IPL 2022) संघ बदलला असला तरी त्यातला 'रॉयल'नेस कायम आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून (Royal Challengers Bangalore) 8 वर्ष खळल्यानंतर युझवेंद्र चहल आता राजस्थानकडून खेळणार आहे.

एका अर्थी ही युझवेंद्र जहलची ही घरवापसी आहे. राजस्ठान रॉयल्सने 2010 ला युझवेंद्र चहलला करारबद्ध केले होते. मात्र त्याला या हंगामात एकही सामना खेळवण्यात आला नव्हता. युझवेंद्र चहल हा गेली आठ वर्षे आरसीबीकडून (RCB) खेळला होता. त्यामुळे त्या संघासोबत त्याचे एक भावनिक नाते तयार झाले होते. त्याच्या या भावना टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बाहेर आल्या. यामुलाखतीत तो म्हणाला की आरसीबीने त्याला रिटेंशन (Retention) बद्दल काही विचारले नव्हते. जर त्यांनी रिटेंशनबद्दल विचारले असते तर रिटेंशनमध्ये पैशाचा (Money) मुद्दा उपस्थित झाला नसता. असे युझी चहल म्हणाला.

युझवेंद्र चहलला आरसीबीने तुला रिटेन करावे अशी तुझी अपेक्षा होती का असे विचारण्यात आले. त्यावेळी त्याने 'विषय असा आहे की त्यांनी विचारले नाही. त्यांनी फक्त मला एक फोन केला आणि सांगितले की आम्ही या तीन खेळाडूना रिटेन केले आहे. जर त्यांनी मला विचारले असते की तुला तू रिटेन व्हावा असे वाटते का मी त्यांना माझा होकार कळवला असता. कारण पैशाचा विषय माझ्या दुय्यम आहे. आरसीबीने मला खूप काही दिले आहे. त्यांनी मला व्यासपीठ दिले. त्यांनी मला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला. चाहत्यांनी प्रेम दिले. त्यामुळे मी आरसीबीशी भावनिकदृष्या जोडलो गेलो आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

चहलने आतापर्यंत 114 आयपीएल सामने खेळवले आहेत. त्यातील 113 सामने हे आरसीबीकडून खेळले आहेत. तेही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली. चहलने 139 विकेट घेतल्या आहेत. चहल फक्त एक सामना मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. हा सामना त्याने 2013 ला रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT