Yuzvendra Chahal Take Revenged of RCB Wife Dhanashri Celebrate  esakal
IPL

VIDEO : चहलने घेतला बदला; पत्नीचा स्टँडमधून दंगा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचे (Yuzvendra Chahal) रॉयल चॅलेंजर बेंगलोरबरोबर (Royal Challengers Benglore) एक भावनिक नाते आहे. याबाबत तो सार्वजनिक ठिकाणी बोलला देखील आहे. युझवेंद्र चहलने एका मुलाखतीत आरसीबीने (RCB) मला रिटेन करण्याबाबत विचारले असते तर मी नक्की हो म्हणालो असतो. त्यावेळी माझ्या दृष्टीने पैसा गौण असता असे तो म्हणाला होता. मात्र आरसीबीने त्याला रिटेन केले नाही. त्याची सल चहलच्या मनात होती. ती त्याने आजच्या आरसीबीच्या सामन्यात आपल्या कामगिरीतून दाखवून दिली.

आरसीबीने राजस्थानचा 170 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि अर्जुन रावत यांनी पॉवर प्लेमध्ये अतिरिक्त जोखीम घेतली नाही. या दोघांनी 55 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर राजस्थानने आरसीबीला धक्के देण्यास सुरूवात केली. पहिला धक्का आरसीबीचा जुना सहकारी युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) दिला. त्याने ड्युप्लेसिसला 29 धावांवर बाद केले. त्यानंतर नवदीप सैनीने अर्जुन रावतला 26 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. आरसीबीचा जुना सहकारी युझी याच्यावरच थांबला नाही. त्याने विराट कोहलीच्या रनआऊटमध्ये देखील महत्वाची भुमिका निभावली. त्याच षटकात चहलने डेव्हिड विलीचा दांडी गुल करत आपली दुसरी शिकार केली.

मात्र आरसीबीने निम्मा संघ 87 धावांवर माघारी गेल्यानंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाद अहमदने डाव सावरला. त्यांनी 15 षटकात संघाला 125 धावांपर्यंत पोहचवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT