yuzvendra chahal wife dhanashree verma 
IPL

IPL 2022 Final एक्साइटमेंटमध्ये मिसेस चहल थिरकली स्टेडिअममध्ये, VIDEO

व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा स्टेडियममध्ये एका इंग्रजी गाण्यावर नाचत आहे.

Kiran Mahanavar

आयपीएलच्या 15 व्या मोसमाची आज सांगता होत असताना पदार्पणातच विजेतेपद मिळवण्याची नवलाई गुजरातचा संघ दाखवणार की, पहिलेवहिले विजेते राजस्थान आज इतिहासाची पुनरावृत्ती करणार? याची उत्सुकता शिगेस पोहचली आहे. यंदा या दोघांमध्ये झालेल्या दोन्ही लढतीत गुजरातने विजय मिळवलेला असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे, परंतु गेल्या दोन सामन्यातील फॉर्म पहाता राजस्थानचा संघही तोडीस तोड आहे.(yuzvendra chahal wife dhanashree verma)

गुजरात व राजस्थान यांच्यामध्ये आतापर्यंत दोन लढती पार पडल्या आहेत. साखळी फेरीच्या लढतीत गुजरातकडून राजस्थानला हार पत्करावी लागली. त्यानंतर हे दोन संघ क्वॉलिफायर मध्ये एकमेकांसमोर उभे होते. याही लढतीत गुजरातनेच बाजी मारली. हार्दिक पंड्याच्या संघाने दोन्ही लढतींत विजय मिळवून राजस्थानवर वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे आयपीएल अंतिम फेरीच्याआधी याच संघाचे पारडे जड आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यासाठी संघातील खेळाडूंच्या पत्नीही खूप उत्सुक आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे राजस्थान रॉयल्सचा खेळाडू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आहे. धनश्रीने सोशल मीडिया एक व्हिडिओ शेअर करत आयपीएल 2022 च्या फायनलबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये ती स्टेडियममध्ये डान्स करतान दिसत आहे. त्याने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा स्टेडियममध्ये एका इंग्रजी गाण्यावर नाचत आहे. त्याने वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या डान्स मूव्ह्स दाखवल्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करत धनश्री वर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, Jiggling the finals त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धनश्री वर्माच्या चाहत्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT