Umran Malik SRH Zaheer Khan : आयपीएल 2022 मध्ये उमरान मलिकने आपल्या वेगवान माऱ्याने मोठी हवा निर्माण केली होती. मात्र आयपीएल 2023 मध्ये त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. सनराईजर्स हैदराबादने यंदाच्या हंगामात उमरानचा वापर हा एक बदली खेळाडू म्हणूनच केला. त्याने यंदाच्या हंगामात आतापर्यंत फक्त 7 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या. त्याने 10.35 धावा प्रती षटक अशा सरासरीने धावा दिल्या.
दरम्यान, भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याने 23 वर्षाच्या वेगवान गोलंदाजाबाबत मोठे वक्तव्य केले. जहीर खान म्हणाला की, फ्रेंचायजीने उमरान मलिकला योग्यरित्या हाताळले नाही. आयपीएलचा गेला हंगाम गाजवल्यानंतर त्याला भारतीय संघात देखील जागा मिळाली होती. तो आठ वनडे आणि आठ टी 20 सामने खेळला आहे.
जिओ सिनेमावर जाणकार म्हणून बोलताना जहीर खान म्हणाला की, 'उमरान मलिकला त्याच्या फ्रेंचायजीने योग्यप्रकारे हाताळले नाही असं मला वाटतं. ज्या प्रकारे फ्रेंचायजीने त्याला हाताळले मला वाटते की हैदराबादने त्याचा अजून अधिक वापर करायला हवा होता. त्यांनी त्याला फार संधी दिली नाही हे दिसतंच आहे.'
जहीर खान पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी तुम्ही एखाद्या युवा वेगवान गोलंदाजाबद्दल बोलता त्यावेळी तुम्ही त्याच्यासाठी एक सहकाऱ्याचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला मार्गदर्शनाची गरज असते. हैदराबादमध्ये दुर्दैवाने ते मिळताना दिसत नाहीये. त्यामुळेच उमरानचा हंगाम असा गेला आहे.'
इरफान पठाणने देखील यापूर्वी हैदराबादने उमरानला योग्य प्रकारे हाताळले नसल्याचे सांगितले होते. इरफान पठाणने यापूर्वी जम्मू काश्मीरच्या या युवा वेगवान गोलंदाजासोबत काम केले आहे. इरफानने ट्विट केली होते की, 'लीगमधील सर्वात वेगवान गोलंदाज बाहेर बसतोय हे समजण्या पलीकडचे आहे. उरमान मलिकला त्याच्या संघाने योग्यरित्या हाताळले नाही.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.