IRE vs IND 1st T20  
क्रीडा

IRE vs IND 1st T20: आजपासून रंगणार आयर्लंड विरुद्धचा टी-20 थरार! स्टार अन् सोनीवर नाही तर येथे पाहा 'फ्री' सामना

सकाळ ऑनलाईन टीम

Ireland vs India T20 Series : जवळपास 11 महिने मैदानापासून दूर राहिल्यानंतर जसप्रीत बुमराह पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. बुमराहने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 25 सप्टेंबर 2022ला हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रोजी खेळला होता. नंतर त्याच्या पाठीच्या खालच्या भागात शस्त्रक्रियाही करावी लागली.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी आज डब्लिन येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ युवा खेळाडूने भरलेला आहे.

त्याच वेळी, आयर्लंडला कमी लेखता येणार नाही, कारण कोणत्याही मोठ्या संघाला चकित करण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होईल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना कधी, कुठे, किती वाजता खेळला जाईल?

भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 18 ऑगस्ट, शुक्रवारी डब्लिनच्या द व्हिलेज मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

भारत विरुद्ध आयर्लंड टी-20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पहायचे?

भारत आणि आयर्लंडचा पहिला टी-20 सामना JioCinema अॅपवर लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.

दोन्ही संघ

भारत : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

आयर्लंड : अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलनी, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट, फिओन हँड, क्रेग यंग, ​​थिओ व्हॅन वॉरकॉम , रॉस एडेअर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT