Ire vs Ind T20 Series : भारत आणि आयर्लंड यांच्यात 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळल्या जाणार आहे. टीम इंडियाचा टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या (hardik pandya) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांना या मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. यानंतर आशिया कप 2023 आणि विश्वचषक 2023 होणार आहेत. आयसीसीच्या या दोन मोठ्या स्पर्धा पाहता टीम इंडिया पांड्या आणि गिल यांना विश्रांती देऊ शकते.
भारताच्या एकदिवसीय संघात पांड्या हा एक महत्त्वाचा खेळाडू आहे, त्यात अष्टपैलू खेळाडू असल्याने संघाचा समतोल राखत खेळणे ही त्याची भूमिका आहे. संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवड समितीने त्याच्याबाबत काळजी घ्यावी असे वाटते.
बोर्डाच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, "अद्याप काहीही ठरलेले नाही आणि एकदिवसीय आणि टी-20 नंतर हार्दिकला कसे वाटते यावर देखील ते अवलंबून आहे." यामध्ये भरपूर प्रवास आहे, कारण फ्लोरिडा ते डब्लिन प्रवास करण्यासाठी फक्त तीन दिवस आहेत.
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दोन संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यानंतर तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी डब्लिन येथे होणार आहे. यानंतर 20 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट रोजी सामने होणार आहेत.
विशेष म्हणजे शुभमनचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स चांगला आहे. त्याने 24 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1311 धावा केल्या आहेत. शुभमनने वनडे फॉरमॅटमध्ये 4 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या 208 धावा आहे. त्याने 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 202 धावा केल्या आहेत.
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने 74 वनडेमध्ये 1584 धावा केल्या आहेत. यासह त्याने 72 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 87 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1271 धावा केल्या आहेत आणि 69 बळी घेतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.