ICC Cricket World Cup Qualifier 2023 sakal
क्रीडा

World Cup Qualifiers: या 4 संघांचे वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगले, आता 6 संघांमध्ये चुरशीची लढत

Kiran Mahanavar

ICC World Cup Qualifiers 2023 Points Table : सध्या झिम्बाब्वेमध्ये 2023 एकदिवसीय विश्वचषकाचे पात्रता सामने खेळले जात आहेत. यामध्ये 10 संघांनी भाग घेतला होता, मात्र आता चार संघ पात्रता फेरीतून बाहेर पडले आहेत.

आयर्लंड, नेपाळ, यूएई आणि युनायटेड स्टेट्स यांचे 2023 वनडे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. हे सर्व संघ पात्रता फेरीतून बाहेर पडले आहेत. आता भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेत पोहोचण्यासाठी 6 संघांमध्ये लढत होणार आहे.

हे संघ सुपर-6 मध्ये पोहोचले

चार संघ पात्रता फेरीतून बाहेर पडले असले तरी या 6 संघांनी सुपर-6 मध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये श्रीलंका, झिम्बाब्वे, नेदरलँड, स्कॉटलंड, ओमान आणि वेस्ट इंडिजचा समावेश आहे. लीग टप्प्यातील चार सामने बाकी असले तरी टॉप-6 चे चित्र स्पष्ट आहे.

29 ऑगस्टपासून सुपर-6 सामने

पात्रता फेरीत 29 ऑगस्टपासून सुपर-6 सामने खेळवले जातील. त्याचा अंतिम सामना 9 जुलै रोजी होणार आहे. पात्रता फेरीतील दोन संघ विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 2023 चा एकदिवसीय विश्वचषक 10 संघांमध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी आठ संघ थेट पात्र ठरले आहेत. आणि अंतिम दोन संघ पात्रता फेरीतून पोहोचतील.

हे आठ संघ थेट ठरले पात्र

यजमान भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत. आता उर्वरित दोन संघ पात्रता फेरीतून उतरतील. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मुख्य स्पर्धा खेळवली जाईल. घरच्या मैदानावर खेळल्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये फेव्हरिट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT