Ireland vs India 1st T20I  esakal
क्रीडा

IRE vs IND 1st T20 : पाऊसही वाचवू शकला नाही आयर्लंडचा पराभव, भारताचा अवघ्या 2 धावांनी विजय

अनिरुद्ध संकपाळ

Ireland vs India 1st T20I : भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे सामन्याचा निकाल हा डकवर्थ लुईस नियमाने लावण्यात आला. भारतीय फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये धडाकेबाज फलंदाजी केल्याने भारताने सामना अवघ्या 2 धावांनी जिंकला.

भारत आणि आयर्लंड यांच्याविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात आयर्लंडने भारतासमोर विजयासाठी 140 धावांचे आव्हान ठेवले. भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडची अवस्था 6 बाद 59 धावा अशी केली असताना बॅरी मॅकार्थेने 33 चेंडूत 51 धावांची खेळी करत आयर्लंडला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबला

क्रेग यंगचे पाठोपाठ दोन धक्के

क्रेग यंगने पॉवर प्लेनंतर भारताला पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने 24 धावांवर खेळणाऱ्या यशस्वी जैसवालला बाद केले. त्यानंतर तिलक वर्माला शुन्यावर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.

45-0 (6 Ov) : भारताच्या पॉवर प्लेमध्येच 45 धावा 

आयर्लंडचे 140 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने पहिल्या 6 षटकातच बिनबाद 45 धावा ठोकल्या. सलामीवीर यशस्वी जैसवालने 22 चेंडूत 24 तर ऋतुराज गायकवाडने 14 चेंडूत 18 धावा केल्या.

IRE 139/7 (20) : बॅरी मॅकार्थेचा झुंजार अर्धशतक 

आयर्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज बॅरी मॅकार्थेने 33 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी करत आयर्लंडला 20 षटकात 7 बाद 139 धावांपर्यंत पोहचवले. भारतासमोर आता विजयासाठी 140 धावांचे आव्हान आहे.

110-6 (16.4 Ov) : कॅम्परने डाव सावरला

भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडची अवस्था 6 बाद 59 धावा अशी अवस्था केल्यानंतर आयर्लंडचे फलंदाज कर्टिस कॅम्पर आणि बॅरी यांनी डाव सावरला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली.

31-4 (6.1 Ov) : भारतीय गोलंदाजांनी कंबरडे मोडले 

जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात दोन धक्के दिल्यानंतर टेक्टर आणि स्टर्लिंग यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोईने दोन धक्के देत आयर्लंडची अवस्था 6 षटकात 4 बाद 30 धावा अशी केली.

IRE 4/2 (1) : पहिल्याच षटकात बुमराहचा धमाका 

भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने आपले पुनरागमन दणक्यात साजरे केले. त्याने आयर्लंडचा सलामीवीर अँड्र्यू बालबिर्नेचा 4 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर लॉर्केन टकरला शुन्यावर बाद करत आयर्लंडची अवस्था 2 बाद 4 धावा अशी केली.

भारताकडून दोन जणांचे पदार्पण 

पहिल्या टी 20 सामन्यात आयपीएलमध्ये मॅच फिनिशर म्हणून आपले नाव कमवणाऱ्या रिंकू सिंहला आणि दुखापतीतून सावरत संघात आलेल्या प्रसिद्ध कृष्णाला आंतरराष्ट्रीय टी 20 पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: निवडणूक आयोगाची शिंदे गटाला नोटीस, खासगी वाहिन्यांवरील प्रचारावर आक्षेप; २४ तासात उत्तर मागवले

पैशांचा विषयच नव्हता...! Rishabh Pant ने दिल्ली कॅपिटल्सच्या निर्णयावर मौन सोडले; सुनील गावस्करांनाही अप्रत्यक्ष ऐकवलं

International men's day 2024 : भाऊ, बाबा, मित्रांना खास संदेश कोट्स आणि शायरीसह 'हॅपी मेन्स डे' साजरा करा.

Nashik Vidhan Sabha Election: नेत्यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा; जिल्ह्यात पंतप्रधान मोदी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवारांसह मान्यवरांच्या सभा

बॉलिवूड सिनेमांपाठोपाठ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मराठी सिनेमाही अग्रेसर ; प्रदर्शनापूर्वीच गुलाबी सिनेमाची कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT