Irfan Pathan Asia Cup 2022 : आशिया चषकापूर्वी भारताचा माजी दिग्गज इरफान पठाणला त्याच्या बायकोला विमानतळावर गैरवर्तन सहन करावे लागले आहे. एका विमान कंपनीकडून झालेल्या चुकीमुळे खेळाडूला खूप त्रास सहन करावा लागला. आशिया चषक 2022 साठी पत्नी आणि मुलांसह मुंबईहून दुबईला निघाला होता. बुकिंग कन्फर्म असूनही त्याला दीड तास विमानतळावर थांबावे लागले. याबाबत इरफानने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इरफान पठाणने ट्विट करत लिहिले की, आज (बुधवार) मी विस्तारा फ्लाइट UK-201 ने मुंबईहून दुबईला निघालो होतो. चेक इन काउंटरवर मला अतिशय वाईट वागणूक मिळाली. विस्ताराने माझ्या कन्फर्म तिकिटात फेरफार केला. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मला सुमारे दीड तास काउंटरवर थांबावे लागले. माझ्यासोबत माझी पत्नी आणि मुलं पण होती. ग्राऊंड स्टाफचे वर्तनही अतिशय उद्धट होते आणि ते खूप कारणे देत होते. माझ्याशिवाय इतर अनेक प्रवाशांनाही अशाच समस्यांचा सामना करावा लागला आहे. मी संबंधित अधिकाऱ्याला विनंती करू इच्छितो की या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा कोणाला अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये.
आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघ 28 ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर हे दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. अखेरच्या भारत-पाकिस्तान सामन्यात बाबर आझमच्या संघाने 10 गडी राखून विजय मिळवला. T20 विश्वचषक 2021 नंतर भारताने टी-20 फॉरमॅटमध्ये 24 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 19 सामने यशस्वी जिंकले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.