Asia Cup 2023 Irfan Pathan Tweet 
क्रीडा

Ind vs Pak : 'शेजाऱ्यांचे टीव्ही...' सामना रद्द झाल्यानंतर पठाणने उडवली पाकिस्तानची खिल्ली!

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Irfan Pathan Tweet : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. टीम इंडियाने कॅंडीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 266 धावा केल्या. दुसरीकडे पाकिस्तानचा डाव पावसामुळे सुरू होऊ शकला नाही. त्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या संमतीनंतर सामना रद्द घोषित करण्यात आला.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने पाकिस्तानची खिल्ली उडवली. X वर पोस्ट करताना, इरफान पठाणने लिहिले की, 'आज अनेक शेजाऱ्यांचे टीव्ही वाचले'.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा निर्णय झाला नसला तरी भारतीय डावादरम्यान किशन आणि पांड्याने दमदार फलंदाजी केली. या दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी 138 धावांची शतकी भागीदारी केली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या डावात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या इशान किशनने 81 चेंडूत 82 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी पांड्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 90 चेंडूत 87 धावा केल्या.

सामन्यादरम्यान पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पाकसाठी शाहीन शाह आफ्रिदीने 10 षटके टाकताना 35 धावा देऊन सर्वाधिक चार यश मिळवले. तर नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी अनुक्रमे तीन विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT