India Vs West Indies : भारताने वेस्ट इंडीज विरूद्धचा तिसरा टी 20 सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात सलामीला आलेल्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 44 चेंडूत 76 धावा करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. त्याच्या या खेळीमुळे भारताला 165 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मदत मिळाली. भारताने आता मालिकेत 2 - 1 अशी आघाडी मिळवली आहे.
दरम्यान, वेस्ट इंडीज विरूद्धचा तिसरा सामना झाल्यानंतर इशान किशनने (Ishan Kishan) सूर्यकुमार यादवची छोटीशी मुलाखत घेतली. या मुलाखतीत इशान किशनने सूर्यकुमार यादवला अडचणीत टाकणारे काही प्रश्न ही विचारले. सूर्यकुमार यादवचा चांगला मित्र असलेल्या इशान किशनने सूर्यकुमार यादवच्या पत्नीवरूनही (Sruyakuamr Yadav Wife) काही प्रश्न विचारले.
सूर्यकुमार यादवची पत्नी सध्या त्याच्यासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यावर आली आहे. मात्र सूर्यकुमारची पत्नी देविशा सूर्यकुमारचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी मैदानात हजर नव्हती. विशेष म्हणजे देविशाने सूर्याचा जो सामना पाहिला नाही त्या सामन्यात सूर्याने दमदार खेळी केली. इंग्लंड दौऱ्यावर देखील ट्रेंटब्रिजमध्ये सूर्यकुमार यादवने शतकी खेळी केली होती. मात्र त्यावेळी पत्नी देविशा सामना पाहण्यासाठी हजर नव्हती. आता वेस्ट इंडीज विरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात देखील सूर्याने अर्धशतकी खेळी केली मात्र त्याती पत्नी स्टेडियममध्ये उपस्थित नव्हती.
हाच मुद्दा पकडून इशान किशनने सूर्यकुमार यादवला मुलाखतीवेळी अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला. इशान या प्रश्नाचे उत्तर देताना सूर्यकुमार यादव देखील थोडा भांबवला. मात्र सूर्यकुमार यादवने मी माझ्या पत्नीचा टॅटू गोंदवून घेतल्याचे सांगत प्रत्येकवेळी पत्नी मैदानात असणे गरजेचे नसते तिची शक्ती माझ्यासोबत कायम आहे असे उत्तर देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमार यावद आणि देविशा हे 2012 मध्ये कॉलेजमध्ये असताना एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांनी 2016 मध्ये लग्न केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.