Ishan Kishan IND vs PAK Asia Cup 2023 
क्रीडा

Ishan Kishan IND vs PAK : ९ चौकार २ षटकार अन् इशानची ऐतिहासिक खेळी! MS धोनीला मागे टाकत केला मोठा पराक्रम

Kiran Mahanavar

Ishan Kishan IND vs PAK : आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संघाची टॉप ऑर्डर लवकर बाद झाली. यानंतर सर्व जबाबदारी मधल्या फळीवर आली.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इशान किशनने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. इशान किशनला वनडेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

याआधी त्याने एक, दोन आणि तीन तसेच चार क्रमांकावर फलंदाजी केली आहे. इशान किशन ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, त्यावरून तो पाचव्या क्रमांकावर अशी फलंदाजी करेल असे वाटले नव्हते, पण संधी मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला. त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा शानदार अर्धशतक झळकले. अशाप्रकारे तो वनडेमध्ये सलग चार अर्धशतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार अर्धशतकं झळकावणारा इशान किशन एमएस धोनीनंतरचा दुसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. एमएस धोनीने 2011 साली इंग्लंडविरुद्ध सलग चार अर्धशतके झळकावली होती.

धोनीला मागे टाकत केला हा मोठा पराक्रम

या सामन्याच्या सुरुवातीला टीम इंडिया खूप अडचणीत असल्याचं दिसत होतं, पण इशान किशननं टीममध्ये पुनरागमन केलं. तो 81 चेंडूत 82 धावा करून बाद झाला. इशान किशनने या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. आशिया कप मध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय यष्टीरक्षकही ठरला आहे. याआधी एमएस धोनीने आशिया कपमध्ये 76 धावांची इनिंग खेळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT