Ishan Refuses To Sign Autograph On Fans Mobile  esakal
क्रीडा

Ishan Kishan : इशान किशनचा चाहत्याला स्वाक्षरी देण्यास नकार, कारण धोनीने खाली...

अनिरुद्ध संकपाळ

Ishan Refuses To Sign Autograph On Fans Mobile : भारताचा स्टार फलंदाज इशान किशनने नुकतेच बांगलादेशविरूद्ध वनडे सामन्यात सर्वात वेगवान द्विशतक ठोकले होते. त्यानंतर इशान किशनची भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये तुफान क्रेझ निर्माण झाली आहे. डावखुरा आक्रमक शैलीचा फलंदाज इशांत किशन सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत देखील आपला धुमाकूळ घालत आहे. त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावत आपला शतकांचा धडाका सुरूच ठेवला आहे.

दरम्यान, इशान किशननला एका चाहत्याने त्याच्या फोनच्या मागील बाजूस स्वाक्षरी करण्याची विनंती केली होती. मात्र इशान किशनने या चाहत्याच्या फोनवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. इशान किशनने चाहत्याला स्वाक्षरीस नकार देण्यामागचे कारण ऐकून तुम्ही देखील इशान किशनचे फॅन होऊन जाल.

इशान किशनने या चाहत्याच्या फोनवर स्वाक्षरी करतेवेळी पाहिले की या फोनवर आधीच भारताचा महान कर्णधार महेंद्रसिंह धोनीची स्वाक्षरी आहे. यानंतर इशान किशनने या फोनवर धोनीच्या स्वाक्षरीवर आपली स्वाक्षरी करण्यास नकार दिला. इशान किशन या चाहत्याला म्हणाला की, 'मी अजून धोनीइतकी उंची गाठू शकलेलो नाही. मी माझी स्वाक्षरी खाली तळात करतो.'

इशान किशन जरी मुळचा बिहारचा असला तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये धोनीच्या राज्याचे म्हणजे झारखंडचे प्रतिनिधित्व करतो. इशान किशन बांगलादेशविरूद्धची वनडे मालिाक संपल्यानंतर मायदेशात परतला असून तो आता रणजी ट्रॉफीत खेळतोय.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT