Rishabh Pant IPL 2024 esakal
क्रीडा

Rishabh Pant IPL 2024 : ऋषभ पंतचा नेटमध्ये सराव, तरी आयपीएलला मुकणार... इशांत शर्मा असं का म्हणतोय?

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant IPL 2024 : बीसीसीआयने नुकतेच आपल्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या तंदुरूस्तीचा अहवाल तयार केला आहे. यात जसप्रीत बुमराह, केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची फिटनेसचा रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आला. हे खेळाडू कोणत्या मालिकेपर्यंत फिट होऊन टीम इंडियात परततील याचा अंदाज बांधण्यात आला. (Rishabh Pant Fitness Update)

भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत कार अपघातानंतर आता दुखापतीतून सावरत असून त्याने नुकतेच नेट्समध्ये फलंदाजी देखील करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पंत आता लवकरत टीम इंडियात परतणार असा अंदाज चाहते वर्तवू लागले आहे.

मात्र भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने (Ishant Sharma) आपल्या दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराच्या फिटनेसबाबत एक वेगळीच माहिती समोर ठेवले.

इशांत शर्माला ऋषभ पंत लवकर फिट होऊन मैदानावर परतेल असा विश्वास वाटत नाही. पंत हा वर्ल्डकप सोडाच पुढच्या आयपीएलमध्ये देखील मैदानावर परतेल याबाबत इशांत शर्माच्या मनात शंका आहे. पंतचा 30 डिसेंबर 2022 ला अपघात झाला होता. दिल्ली देहरादून महामार्गावर त्याच्या गाडीला अपघात झाला त्यात त्यात तो थोडक्यात बचावला होता. त्याच्या गुडघ्याचे तीन लिगामेंट टिअर झाले होते.

इशांत शर्मा काय म्हणाला?

इशांत शर्मा सध्या भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेत समालोचकाची भुमिका बजावत आहे. त्यावेळी तो म्हणाला की, 'मला असे वाटते की ऋषभ पंतला आयपीएलच्या 17 व्या हंगामात (IPL 2024) देखील खेळणार नाही. कारण ऋषभ पंतची दुखापत ही काही छोटी दुखापत नाहीये. ती खूप गंभीर घटना होती.'

'त्याने आता कुठे फलंदाजी आणि विकेटकिपिंग सुरू केली आहे. त्याला आजून वेगाने धावायचं आणि धावाता धावाता वळायचा सरावर करावा लागणार आहे. एक विकेटकिपर आणि फलंदाजासाठी हे सोपं नाही.'

इशांत पुढे म्हणाला की, 'त्याची दुसरी शस्त्रक्रिया झाली नाही ही चांगली गोष्ट आहे. जर त्याची दुसरी शस्त्रक्रिया झाली असती तर तो अजून काही काळ बाहेर राहिला असता. आताच त्याची शस्त्रक्रिया झाली आहे. मला नाहीत वाटत की तो वर्ल्डकप खेळू शकले. आशा आहे की तो आयपीएलपर्यंत फिट होईल असं झालं तर खूप चांगलं आहे.'

पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नर DC चा कर्णधार

आयपीएल 2023 मध्ये ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. या हंगामात फ्रेंचायजीची कामगिरी चांगली झाली नाही. संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला होता. जर पंत अजून एका हंगामाला मुकला तर फ्रेंचायजीसाठी ही खूप मोठी डोकेदुखी ठरले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT