Ishant Sharma Ind vs Wi Test Series 
क्रीडा

Ishant Sharma : संघाबाहेर असलेल्या इशांत शर्माची वेस्ट इंडिज दौऱ्यावर अचानक एन्ट्री!

Kiran Mahanavar

Ishant Sharma Ind vs Wi Test Series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 12 जुलैपासून 2 कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना डॉमिनिका येथे होणार आहे. या सामन्यासह जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 ​​सायकलमधील भारताच्या मोहिमेला सुरुवात होईल.

यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या नव्या खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली आहे. अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत दोघांपैकी एकाचे पदार्पण शक्य आहे. यशस्वी जैस्वाल यांची प्रबळ दावेदार आहे.

त्याचवेळी या कसोटीपूर्वी मोठी बातमी समोर येत आहे की, बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज इशांत शर्माची एंट्री होणार आहे. या नव्या भूमिकेतून तो मैदानात दिसणार आहे.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा 2021 या वर्षापासून बाहेर आहे. बीसीसीआयकडून त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. तर इशांतची निवड झाली नाही.

इशांत शर्माची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली नाही, तेव्हा त्याने या मालिकेत कॉमेंट्री करण्याचे ठरवले. हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये इशांत नव्या भूमिकेत दिसणार आहे. इंग्रजी, हिंदी व्यतिरिक्त, भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे भाष्य भोजपुरी, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्येही केले जाईल.

इशांत शर्माची कारकीर्दही शेवटच्या टप्प्यातून जात आहे. इशांत नुकताच कसोटी संघात परतला होता पण बीसीसीआयने त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत संधी दिली नाही.

34 वर्षीय इशांतने 105 कसोटी, 80 एकदिवसीय आणि 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 311, एकदिवसीय सामन्यात 115 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत. 2021 मध्ये तो टीम इंडियाकडून शेवटचा खेळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT