बाकू : भारताने आयएसएसएफ वर्ल्डकप (ISSF World Cup) स्पर्धेत सुवर्णपदकने आपले खाते उघडले. भारतीय महिला नेमबाज संघाने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताच्या सुवर्णपदक विजेत्या संघात एलाव्हेनिल एल्वेनिल, रमिता आणि श्रेया अग्रवाल यांचा समावेश आहे. ही स्पर्धा अझरबौजानमधील बाकू शहरात होत आहे.
या तिघींनी (Indian Women's Shooting Team) डेन्मार्कच्या अॅना निलसेन, एमा कोच आणि रिक्की एबसेन यांचा 17-5 असा पराभव केला. डेन्मार्कने रौप्य पदक आणि पोलंडने कांस्य पदक पटकावले. माजी वर्ल्ड नंबर वन एल्वेनिल, रमिता आणि श्रेया यांनी दोन फेऱ्यांची पात्रता फेरी पार करत अंतिम फेरी गाठली होती.
भारतीय महिला संघाने पहिल्यांदा पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले. त्यांनी 90 शॉटमध्ये एकत्रित 944.4 गुण मिळवले. त्यानंतर दुसऱ्या फेरीत ते दुसऱ्या स्थानावर घसरले. डेन्मार्कने टॉप केलं होतं. यानंतर सुवर्णपदकासाठी सामना केला.
पुरूषांच्या रायफल सांघिक प्रकारात भारताच्या रूद्रांक्ष पाटील, पार्थ मखिजा आणि धनुष श्रीकांत यांना कांस्य पदकासाठीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना क्रोएशियाने 10-16 असा पराभव केला. तर भारतीय रायफल 12 सदस्यीय संघ पदक तालिकेत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. या गुणतालिकेत सर्बिया दोन सुवर्णासह चार पदके घेऊन अव्वल स्थानावर आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.