Italy PM Meloni encourages Angela Carini Sakal
क्रीडा

Angela Carini vs Imane Khelif: इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचा अँजेलाला फुल सपोर्ट; म्हणाल्या, 'तू हार मानणार नाहीस...'

Paris Olympic 2024 Women's Boxing: पॅरिस ऑलिम्पिकमधील महिला बॉक्सिंगमध्ये अँजेला कॅरिनीने ४६ सेकंदात इमान खलिफविरुद्धचा सामना सोडल्याने नव्या वादाला सुरूवात झाली आहे. या सामन्यानंतर इटलीच्या पंतप्रधान अँजेला हिला भेटल्या होत्या.

Pranali Kodre

Italy PM Meloni encourages Angela Carini: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत गुरुवारी एक मोठा वाद समोर आला आहे. महिला बॉक्सिंगमध्ये बेल्टरवेट प्रकारातील उपउपांत्यपूर्व फेरीत अल्जेरियन बॉक्सर इमान खलिफने इटलीच्या अँजेला कॅरिनीचा ४६ सेकंदात पराभव केला. मात्र, या सामन्यानंतर खलिफच्या लिंगाबाबत चर्चा होत आहे. ती बॉयोलॉजिकली पुरुष असल्याचा दावा केला जात आहे.

अँजेलाने सामन्यानंतर म्हटले होते की खलिफने तिला जोरात पंच मारला. तिचा पंच अँजेलाच्या नाकाला जोरात लागला. ज्यानंतर तिने सामन्यातून माघार घेतली. तसेच तिने असंही म्हटलं की आत्तापर्यंत इतका जोरात पंच कोणीच तिला मारला नव्हता.

दरम्यान, या वादादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या देशाच्या खेळाडूचं मनोबल वाढवलं आहे.

मेलोनी यांनी अँजेलाला धीर देतानाचा फोटो पोस्ट केला आहे आणि लिहिले की 'मला माहित आहे की अँजेला की तू हार मानणार नाही. एकदिवस तुला तू ज्यासाठी पात्र आहेस, ते सर्व तुला तुझ्या मेहनतीने मिळेले, अशा स्पर्धेत जिथे समानता असेल.'

मेलोनी यांच्याबरोबरची भेट आईच्या भेटीप्रमाणे होती, असं अँजेलाने नंतर म्हटलं आहे. त्यांनी तिला हार न मानण्याबद्दल सांगितलं आहे.

मेलोनी यांनी सामन्याबद्दल अशीही प्रतिक्रिया दिली होती की ज्या खेळाडूची गुणसुत्रे पुरुषाची आहेत, त्या खेळाडूला महिलांच्या स्पर्धेत खेळवायला नको होते.

या वादावर आता जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. गेल्यावर्षी नवी दिल्लीत झालेल्या महिला वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत खलिफ आणि तैवानच्या लीन यु-टींग यांना लिंग पात्रता चाचणीत अपयशी ठरल्याने अपात्र ठरवलं होतं.

दरम्यान आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने लिंग पात्रता चाचणीमध्ये त्या का अपयशी ठरल्या, याबाबत खुलासा केला नव्हता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की खलिफ ही ट्रान्सजेंडर किंवा इंटरसेक्स म्हणूनही ओळखली जात नाही.

याशिवाय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खलिफला खेळू देण्याच्या निर्णय का घेण्यात आला याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की महिला गटात नियमांचे पालन करून खेळाडूंना सहभागी करण्यात आलं आहे. त्यांच्या पासपोर्टवर त्या महिला म्हणून नोंद आहे. त्यामुळे या प्रकरणात त्या महिला असल्याचं समजलं जात आहे.

दरम्यान, आता खलिफची पुढची लढत हंगेरीच्या ऍना लुका हामोरीविरुद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT