AUS vs NZ : ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 389 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने देखील 383 धावांपर्यंत मजल मारली. रचिन रविंद्रने 116 धावांची झुंजार शतकी खेळी आणि डॅरेल मिचेलने 54 धावांची अर्धशतकी खेळी केल्यानंतर जेम्स नीशमने 58 धावांची खेळी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. मात्र विजयासाठी 2 चेंडूत 7 धावांची गरज असताना तो धावाबाद झाला. नीशम धावबाद झाला अन् 2019 च्या वर्ल्डकप फायनलची आठवण क्रिकेट चाहत्यांना झाली.
2019 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर मार्टिन गप्टिल शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेताना धावबाद झाला अन् न्यूझीलंडच्या हातात आलेला वर्ल्डकप टाय सुपर ओव्हरमुळे निसटला. त्यावेळी विश्वविजेता हा सर्वाधिक बाऊंड्रीच्या संख्येवरून ठरवण्यात आला.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात याच रन आऊटच्या आठवणी ताज्या झाल्या. न्यूझीलंडला शेवटच्या षटकात विजयासाठी 19 धावांची गरज असताना स्टार्कने दुसऱ्याच चेंडूवर वाईड अन् बाईज बाऊंड्रीच्या 5 धावा दिल्या. त्यानंतर निशमने दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर प्रत्येकी 2 धावा करत सामना 2 चेंडूत 7 धावा असा आणला होता.
मात्र पाचव्या चेंडूवर नीशमचा पुन्हा दोन धावा घेण्याचा प्रयत्न फसला. लाबुशेनच्या थ्रोवर विकेटकिपर जॉश इंग्लिसने डाईव्ह मारत नीशमला धावबाद केलं अन् न्यूझीलंडने सामना 5 धावांनी गमावला.
यापूर्वी लाबुशेनने नीशमचे दोन चौकार अडवत उत्कृष्ट फिल्डिंगचे प्रदर्शन केले होते. ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना ट्रॅविस हेडने झंजावाती 109 धावांची शतकी खेळी केली. त्याला डेव्हिड वॉर्नरने 81धावा करून चांगली साथ दिली होती.
मॅक्सवेलने 24 चेंडूत 41 तर कर्णधार पॅट कमिन्सने 14 चेंडूत 37 धावा चोपत ऑस्ट्रेलियाला 388 धावांपर्यंत पोहचवले. गोलंदाजीत झाम्पाने 3 तर कमिन्स आणि हेजलवूडने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.