Japan Open 2023 Lakshya Sen  esakal
क्रीडा

Japan Open 2023 : लक्ष्य सेनने महिन्यात तिसऱ्यांदा गाठली सेमी फायनल, सात्विक - चिरागचा विजयी रथ रोखला

अनिरुद्ध संकपाळ

Japan Open 2023 : जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने दमदार कामगिरी करत सेमी फायनल गाठली. त्याने जपानच्या कोकी वातानाबेचा सरळ गेममध्ये पराभव केला. वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 मध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या 13 व्या स्थानावरील लक्ष सेनने जागतिक रँकिंगमध्ये 33 व्या स्थानावरील वातानाबेचा 21 - 15, 21 - 19 अशा सरळ गेममध्ये पराभूत केले.

सलग तिसऱ्यांदा पोहचला सेमी फायनलमध्ये

सेनने 4 ते 9 जुलै दरम्यान झालेल्या कॅनडा आणि 11 ते 16 जुलै दरम्यान झालेल्या युएस ओपन आणि आता जपान ओपन अशा सलग तीन स्पर्धांमध्ये लक्ष्य सेन सेमी फायनलमध्ये पोहचला आहे.

कॅनडला ओपन सुपर 500 जिंकणाऱ्या सेनने (Lakshya Sen) जपानच्या वातानाबेविरूद्धच्या सामन्यात पहिल्या गेमची 5 - 3 अशी सुरूवात केली. त्यानंतर ब्रेकपर्यंत त्याने 11 - 7 अशी आघाडी घेतली. पहिल्या गेममध्ये जपानच्या बॅडमिंटनपटूला फारसा प्रतिकार करता आला नाही.

मात्र दुसऱ्या गेममध्ये वातानाबेने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सेनने आपली लय बिघडू दिली नाही. एका वेळी सामना 18 - 17 असा अटीतटीचा झाला होता. मात्र दोन रिटर्नसह लक्ष्यने मॅच पॉईंट मिळवला. यानंतर बॅकलाईनवर दमदार रिटर्नसह आपला विजय नोंदवला.

सात्विक - चिरागला पराभवाचा धक्का

भारताची पुरूष दुहेरी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी सध्या दमदार फॉर्ममध्ये आहेत. मात्र त्यांना जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. (Satwiksairaj Reddy Chirag Shetty)

ऑलिम्पिक चॅम्पियन तैवनची जोडी ली यांग आणि वांग ची लान यांनी 21 - 15, 23 - 25, 21 - 16 असा पराभव केला. या हंगामात सात्वित आणि चिरागने कोरिया ओपन सुपर 500, स्विस ओपन सुपर 300 आणि इंडोनेशिया ओपन सुपर 1000 टायटल जिंकले आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT