Naomi Osaka Twitter
क्रीडा

डिप्रेशनमधून सावरली; पण घरातच गोल्डन स्वप्नाला सुरुंग

दिग्गज खेळाडूचा सरळ सेटमध्ये पराभव

सुशांत जाधव

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत महिला बॅडमिंटन एकेरीत मोठा उलट फेर पाहायला मिळाला. सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार असलेली जपानची दिग्गज टेनिस स्टार नाओमी ओसाका (Naomi Osaka) हिला 6-1, 6-4 असे पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या नाओमीला 41व्या मानांकित मार्केटा वोन्ड्रासोवा हिने पराभवाचा धक्का दिला. चेक प्रजात्ताकच्या खेळाडूने दिमाखदार खेळ करत अशक्यप्राय वाटणाऱ्या सामन्यात दिग्गज खेळाडूला सरळ सेटमध्ये पराभूत करुन दाखवले. तिची ही कामगिरी टेनिस प्रेमींच्या भुवया उंचावणारी अशीच आहे.

मार्केचा वोड्रोउसोवाने आपल्या दमदार खेळीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. मानसिक तणावामुळे फ्रेंच ओपन स्पर्धेतून घेतलेली माघार आणि त्यानंतर विम्बल्डनमध्ये न खेळण्याचा निर्णय यामुळे ओसाकाच्या आगामी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. यासंदर्भात अनेक चर्चा रंगत असताना ती ऑलिम्पिकच्या रिंगणात उतरली. तिने स्पर्धेत दिमाखदार सुरुवातही केली. तिसऱ्या फेरीत मात्र तिला धक्कादाय पराभवाचा सामना करावा लागला. नाओमी अगोदर जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या अश्ले बार्ती उलटफेरची शिकार झाली होती. ऑस्ट्रेलियन बार्तीला ऑलिम्पिकच्या पहिल्याच सामन्यात स्पेनच्या सारा सोरिबेज टोरमोने पराभूत केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT