Jasprit Bumrah Fitness Update esakal
क्रीडा

Jasprit Bumrah : हे सोपं नसतं.... म्हणत जसप्रीत बुमराहने VIDEO केला शेअर

अनिरुद्ध संकपाळ

Jasprit Bumrah Fitness Update : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 22 सप्टेंबरपासून भारतीय संघात दिसलेला नाही. आशिया कपदरम्यान जसप्रीत बुमराहच्या पाठदुखीने पुन्हा उचल खाल्याने त्याला आशिया कपबरोबरच ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपला देखील मुकावे लागले. भारताला ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपमध्ये बुमराहची कमतरता प्रकर्षाने जाणवली. दरम्यान, जसप्रीत बुमराहने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. बुमराहचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वर्ल्डकपला मुकलेला जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 आणि वनडे मालिकेत देखील खेळला नाही. याचबरोबर बांगलादेशविरूद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी देखील त्याचे नाव संघात समाविष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, 28 वर्षाचा हा भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज दुखापतीतून सावरला आहे की नाही याबाबत चाहत्यांच्या मनात शंका होती. आता बुमराच्या नव्या व्हिडिओवरून ही शंका दूर होईल.

जसप्रीत बुमराहने आपल्या फिटनेसवर काम सुरू केले असून त्याने फिटिनेस ड्रील्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने 'हे सोपं नसतं. मात्र कायम याने फायदाच होतो.' असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, बीसीसीआयने जसप्रीत बुमराह फिट झाला आहे की नाही याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र जसप्रीत बुमराह अजून काही महिने तरी भारतीय संघात परतू शकणार नाही असं दिसतंय.

बीसीसीआय देखील जसप्रीत बुमराहच्या बाबतीत काळजीपूर्वक पावले टाकत आहे. आशिया कपमध्ये त्याला खेळवण्याची घाई भारताला टी 20 वर्ल्डकपमध्ये खूप महागात पडली होती. त्यामुळे आता बीसीसीआय खेळाडू भारतात 2023 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपपूर्वी फिट कसे राहतील याची काळजी घेत आहे. बुमराह अजून एक वर्ल्डकपला मुकणे बीसीसीआयला आता परवडणारे नाही.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT