Jasprit Bumrah Ravindra Jadeja Injury : चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी टी 20 आणि वनडे संघाची घोषणा केली. या दोन्ही संघात भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे नाव नाहीये. बीसीसीआयने निवडसमितीला जर जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा सामना खेळण्यासाठी फिट नसतील तर त्यांना निवडू नका असे स्पष्ट सांगितले होते.
आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा या दोघांसाठी एक विशेष सेशन आयोजित केले आहे. भारतीय संघात परतण्यापूर्वी हे दोन्ही खेळाडू मॅच स्टिम्युलेशनमधून जाणार आहे.
याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी अत्यंत महत्वाचे खेळाडू आहेत. यापूर्वी आम्ही दुखापतींबाबत घाई गडबडीत निर्णय घेतला होता. त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली आहे. मात्र यावेळी खेळाडूंच्या फिटनेसबाबत कोणताही धोका पत्करला जाणार नाही. या दोघांनीही एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट पास केली आहे. मात्र आम्हाला वाटते की त्यांना अजून थोडा वेळ द्यावा.' (Sports Latest News)
भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी
दीपक चाहर ( मांडीचा स्नायू)
प्रसिद्ध कृष्णा (पाठदुखी)
मोहम्मद शमी (खांदा)
रविंद्र जडेजा (गुडघा)
जसप्रीत बुमराह (पाठदुखी)
रोहित शर्मा (अंगठा)
ऋषभ पंत (गुडघा)
श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग
श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठीचा भारतीय संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.