Jasprit Bumrah : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे 2022 च्या टी-20 विश्वचषकातून बाहेर जाऊ शकतो. भारतीय क्रिकेट संघाच्या या बातमीने अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच निराशाजनक होती. बुमराहची आफ्रिकेच्या टी-20 मालिकेसाठीही निवड करण्यात आली होती. मात्र पहिल्या सामन्यात तो तंदुरुस्त नसल्यामुळे तो खेळू शकला नाही. नंतर सांगण्यात आले की त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळू शकणार नाही.
जसप्रीत बुमराहला 'स्ट्रेस फ्रॅक्चर' नाही तर 'स्ट्रेस रिॲक्शन''चा त्रास झाला आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने ही माहिती दिली आहे. 'स्ट्रेस रिॲक्शन' ही 'स्ट्रेस फ्रॅक्चर' सारखी मोठी दुखापत नाही. बरे होण्यासाठी 4 ते 6 आठवडे लागू शकतात. याचा अर्थ जसप्रीत बुमराह 2022 च्या T20 विश्वचषकातील बाद फेरीसाठी उपलब्ध होऊ शकतो. जाणून घ्या फरक...
स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे काय ?
बुमराच्या पाठीमागे स्ट्रेस फॅक्चर झालं आहेत. जेव्हा तुम्ही शरीराच्या एका भागावर जास्त ताण देता, तेव्हा तुमच्या स्नायू किंवा हाडांना दुखापत होऊ शकते. स्नायू किंवा हाडांना त्यावेळी छोटं फ्रॅक्चर होते. त्यामुळे यासाठी शरीराच्या एकाच भागावर जास्त ताण पडू नये, याची काळजी घ्या.
स्ट्रेस रिॲक्शन म्हणजे नेमकं काय?
स्ट्रेस हा मनाच्या पातळीवर सुरू होतो. पण हळूहळू त्याचे आंतरिक अवयवांवर परिणाम दिसू लागतात. ही आंतरिंद्रिये त्यांच्यापरीने लढत असतात. परंतु, जेव्हा त्यांची शक्ती कमी होत जाते. तसतसा शरीरात रोगांचा शिरकाव व्हायला लागतो. यांच्यावर उपाय म्हणून आपण लगेच औषधांकडे धाव घेतो. परंतु, औषधांकडे धाव घेण्यापूर्वी आपल्या जीवनशैलीतच थोडा बदल केला तर या समस्येवर नक्कीच मात करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.