Ind vs Eng Test: भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत (Ind vs Eng 1st Test) इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. त्यामुळे शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावा तर इंग्लंडला ९ बळींची गरज होती. पण पावसामुळे (Rain Stopped Play) शेवटच्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे सामना अनिर्णित (Match Drawn) राहिला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकले. याउलट भारती कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होऊन माघारी गेला. त्यामुळे फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत त्याची घसरण होऊन रूटने त्याला मागे टाकले. पण गोलंदाजांच्या यादीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र Top 10 मध्ये समाविष्ट झाला.
विराटची क्रमवारीत घसरण, रोहित आपल्या स्थानी कायम
पहिला कसोटी सामना सुरू होण्याआधी विराट कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत चौथ्या तर जो रूट पाचव्या स्थानी होता. रूटने पहिल्या डावात दमदार अर्धशतक ठोकले. त्यानंतर भारताच्या पहिल्या डावात विराट शून्यावर बाद झाला. अखेरीस इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूटने शतक ठोकत दमदार खेळी केली. त्यामुळे रूटला क्रमवारीत बढती मिळाली. तो चौथ्या स्थानी विराजमान झाला आणि त्याने विराटला एक स्थान खाली ढकलले. रोहित शर्माने मात्र आपले सहावे स्थान कायम राखले.
बुमराहची दहा स्थानांची हनुमानउडी
भारताकडून पहिल्या सामन्यात भेदक गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला Top 10 मध्ये स्थान मिळाले. त्याने थेट १० स्थानांची उडी घेत नववी जागा पटकावली. Top 10मध्ये इतके दिवस केवळ भारताचा रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानी होता. त्यात आता बुमराहची भर पडली. याच यादीत इंग्लंडचा जेम्स अँडरसन याने एका स्थानाची बढती मिळवत सातवे स्थान पटकावले. त्याने आपला सहकारी स्टुअर्ट ब्रॉड याला एका स्थानाने खाली ढकलले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.