Jasprit Bumrah Mother Reaction After Son Became Indian Test Team Captain ESAKAL
क्रीडा

VIDEO : कर्णधार जसप्रीत बुमराहला आईने पहिल्या कसोटीसाठी दिल्या टिप्स

अनिरुद्ध संकपाळ

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना आजपासून सुरू झाला. या सामन्यात भारताचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) करत आहे. भारताचे महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्यानंतर 35 वर्षांनी पहिल्यांदाच कसोटीत एक वेगवान गोलंदाज कर्णधारपद भुषवत आहे. जसप्रीत बुमराह हा भारताचा 36 वा कसोटी कर्णधार झाला आहे.

दरम्यान, जसप्रीत बुमराहला कसोटीत कर्णधारपद भुषवण्यास मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती याची माहिती त्याची पत्नी आणि क्रिकेट कॉमेंटेटर संजना गणेशनने (Sanjana Ganesan) दिली. आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओत महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) जसप्रीत बुमराहच्या कुटुंबियांबरोबर संवाद साधला. यावेळी बुमराहची आई (Mother) खूप खूष झाली होती. याचबरोबर बुमराहच्या आईने बुमराहला मालिकेचा विजेता ठरवणाऱ्या कसोटीसाठी काही टिप्सही दिल्या.

याबाबत बोलताना संजना म्हणाली की, 'आई खूप उत्साहित आहेत. त्यांना जसप्रीतने नेहमीच चांगली कामगिरी करावी असे वाटते. जसप्रीतला क्रिकेट खूप आवडतं त्याच्या आईने जसप्रीतचा आतापर्यंतचा सगळा प्रवास पाहिला आहे. त्यांना ज्यावेळी जसप्रीत बुमराह कर्णधार झाला आहे हे कळाल्यानंतर त्या खूप आनंदी झाल्या होत्या. त्यांनी त्याला खूप टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या. त्या जरी कधी क्रिकेट खेळल्या नसल्या तरी त्यांनी त्याला सल्ला दिला. आई अशीच असते. तू कसा विचार करायला पाहिजेस तू काय करायला पाहिजे असं सगळं त्यांनी त्याला सांगितलं.'

भारतीय संघाचे नेतृत्व एक वेगवान गोलंदाजाने करणे ही खूप दुर्मिळ बाब आहे. जसप्रीत बुमराहला तो खूप सन्मानित झाल्यासारखे वाटते आहे. याचबरोबर त्याच्यावर मोठी जबाबदारी असल्याचेही तो म्हणाला. जसप्रीत बुमराहचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप वेगाने चांगला प्रवास झाला आहे. त्याने जानेवारी 2018 मध्ये कसोटी पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत फक्त चार हंगामच कसोटी क्रिकेट खेळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT