Jasprit Bumrah Instagram Story News Marathi sakal
क्रीडा

Jasprit Bumrah : बुमराहच्या इस्टाग्राम पोस्टमुळे उडाली खळबळ! नंबर-1 गोलंदाज बनल्यानंतर कोणावर साधला निशाणा?

Jasprit Bumrah Reaction News : जसप्रीत बुमराह हा भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे आणि...

Kiran Mahanavar

Jasprit Bumrah Instagram Story : जसप्रीत बुमराह हा भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. आणि तो नुकताच आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर-1 गोलंदाज बनला आहे. त्याने आपलाच सहकारी खेळाडू आर अश्विनकडून नंबर-1चा ताज हिसकावून घेतला आहे.

जसप्रीत बुमराह कसोटीत नंबर वन गोलंदाज बनण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी त्याने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये ही कामगिरी केली होती. कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. या खास प्रसंगी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे जी व्हायरल होत आहे.

नंबर-1 बनल्यानंतर जसप्रीत बुमराह काय म्हणाला?

कसोटीत नंबर-1 गोलंदाज बनल्यानंतर जसप्रीत बुमराहने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये दोन फोटो दिसत आहेत. ज्यामध्ये लोकांच्या खचाखच भरलेल्या स्टेडियमसमोर फक्त एका समर्थकासह रिकामा स्टँड दिसतो.

या पोस्टद्वारे त्यांनी समर्थन करणाऱ्या आणि अभिनंदन करणाऱ्या लोकांची तुलना केली आहे. या फोटोमध्ये फक्त एक समर्थक पाठिंबा देण्यासाठी बसला आहे आणि संपूर्ण स्टँड शुभेच्छासाठी खचाखच भरलेले दिसत आहे. या पोस्टद्वारे बुमराहने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. खरंतर, बुमराह 2021 मध्ये बॅक स्ट्रेस फ्रॅक्चरने त्रस्त होता. यामुळे तो जवळपास एक वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला.

गेल्या वर्षी त्याने आशिया कपपूर्वी आयर्लंड मालिकेतून पुनरागमन केले आणि त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केली. आता तो कसोटीतही इतिहास रचत आहे. मात्र, तो क्रिकेटपासून दूर असताना टीकाकारांनी त्याच्यावर निशाणा साधत त्याची कारकीर्द संपल्याचे सांगितले. दुखापतीतून तो पुनरागमन करू शकणार नाही, पण त्याने पुनरागमन करून इतिहास रचला. अशा परिस्थितीत त्यांची ही पोस्ट त्या टीकाकारांना प्रत्युत्तर मानली जात आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. जसप्रीत बुमराहने या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोन सामन्यांत 10.66 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या आहेत. विशाखापट्टणम येथे नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात त्याने टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 6 तर दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या. या चमकदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.

ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराह 881 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर कागिसो रबाडा दुसऱ्या स्थानावर कायम आहे. पण आर अश्विन पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग गुण 841 आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका आर अश्विनसाठी आतापर्यंत काही खास राहिलेली नाही. त्याला 2 सामन्यांच्या 4 डावात फक्त 9 विकेट घेता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT