Jasprit Bumrah Ruled Out From T20 World Cup 2022 Australia Due To Back Injury  sakal
क्रीडा

Jasprit Bumrah : अखेर बुमराह टी 20 वर्ल्डकपमधून बाहेर

अनिरुद्ध संकपाळ

Jasprit Bumrah : भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमधून बाहेर गेला आहे. पाठदुखीने पुन्हा उचल खाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर पडला होता. आता तो वर्ल्डकपमधूनही बाहेर पडला आहे. आता बीसीसीआय जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून कोणाला वर्ल्डकप खेळण्याची संधी देते हे पहावे लागले. सध्या मोहम्मद शमी, दीपक चाहर आणि मोहम्मद सिराज यांची नावे चर्चेत आहेत. बुमराहच्या रिप्लेसमेंटची घोषणा बीसीसीआय येत्या दोन दिवसात करण्याची शक्यता आहे. (Jasprit Bumrah Ruled Out From T20 World Cup 2022 Australia Due To Back Injury)

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी टी 20 वर्ल्डकप संघातून बाहेर गेल्याचे सांगितले. हा निर्णय तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलून घेण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले. जसप्रीत बुमराह ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला होता त्याचवेळी त्याच्या वर्ल्डकप संघातील समावेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

तो ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात देखील खेळला नव्हता. तो इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघात दोन महिन्यांनी परतला होता. मात्र तो पूर्णपणे फिट झाला होता की नाही हे अजून समजू शकलेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन सामन्यांसाठी बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून मोहम्मद सिराजची निवड करण्यात आली. मात्र त्याला दुसरा सामना खेळवण्यात आला नाही.

एकंदर जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून स्टँड बायमध्ये असलेले मोहम्मद शमी आणि दीपक चाहर यांची विचार प्रामुख्याने केला जाऊ शकतो. शमी सध्या कोरोनामधून सावरत आहे. तर दीपक चाहर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत खेळत असून तो वनडे मालिका देखील खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT