Jasprit Bumrah Fitness Update esakal
क्रीडा

Jasprit Bumrah Team India : खुशखबर! बुमराह भारतीय संघात परतणार; श्रेयस अय्यरने वाढवली निवडसमितीची डोकेदुखी

अनिरुद्ध संकपाळ

Jasprit Bumrah Fitness Update : भारताचा वेस्ट इंडीज दौरा झाल्यानंतर टीम इंडिया पुढच्या महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर देखील जाणार आहे. या दौऱ्यावर भारताचा युवा संघ पाठवण्यात येणार आहे. असे असले तरी या दौऱ्यावर भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिलासा आणि आनंद देणारी गोष्ट घडण्याची शक्यता आहे.

आयर्लंड दौऱ्यावर भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता आहे. तो आता पूर्णपणे फिट होण्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. सध्या तो बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकॅडमीत ट्रेनिंग करत आहे.

तो आपला गोलंदाजीचा कोटा हळू हळू वाढवत आहे. जसप्रीत बुमराह बरोबरच श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णा देखील आशिया कपपर्यंत फिट होण्याची शक्यता आहे. (Jasprit Bumrah Fitness Update)

बुमराहचा वर्कलोड वाढवला

जसप्रीत बुमराहच्या पाठीवर मार्च 2023 मध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो भारतीय संघातून बाहेरच होता. तो एनसीएमध्ये (NCA) रिहॅबिलिटेशन करत होता. गेल्या महिन्यात त्याने गोलंदाजी करण्यास सुरूवात केली होती.

लक्ष्मण यांच्या देखरेखीखाली को नेट्समध्ये पूर्ण ताकदीने गोलंदाजी करत असून तो 8 ते 10 षटके टाकत आहे. निवडसमितीला आशा आहे की तो सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कपपूर्वी फिट होईल. (Cricket Latest News In Marathi)

बुमराहला नेट्समध्ये गोलंदाजी करताना कोणतीही अडचण येत नाहीये. त्यामुळे तो एनसीएमध्ये काही सराव सामने देखील खेळू शकतो. गेल्या काही आठवड्यातील त्याची प्रगती पाहता तो पुढच्या महिन्यात भारतीय संघासोबत आयर्लंड दौरा देखील करू शकतो.

येत्या काही दिवसात त्याच्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. बुमराह सप्टेंबर 2022 पासून सामना खेळलेला नाही.

प्रसिद्ध कृष्णा आहे ट्रॅकवर

भारताचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा देखील आपल्या स्ट्रेस फ्रॅक्चर सर्जरीनंतर दुखापतीतून सावरत आहे. त्याने देखील पुन्हा गोलंदाजी करणे सुरू केले आहे. तो देखील दुखापतीमुळे आयपीएल 2023 चा हंगाम खेळला नव्हता. मात्र तो वर्ल्डकप पर्यंत फिट होणार की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही. मात्र त्याने नेट्समध्ये गोलंदाजी करण्यास सुरूवात केली आहे. (Cricket News In Marathi)

श्रेयस अय्यर वाढवणार निवडसमितीची डोकेदुखी

जसप्रीत बुमराहप्रमाणे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer Fitness Update) देखील पाठीच्या दुखापतीतून सावरत असून त्याने देखील आपल्या पाठीवर शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्याने आता नेट्समध्ये फलंदाजी करण्यास सुरूवात केली असून तो देखील संघ निवडीसाठी लवकरच उपलब्ध होऊ शकतो.

त्यामुळे निवडसमितीसमोर मधल्या फळीत कोणाला संधी द्यायची हा प्रश्न उभारू शकतो. बुमराहप्रमाणे अय्यर देखील आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियासोबत जाऊ शकतो.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT