Jasprit Bumrah To Be Rested During 4th Test At Ranchi Vs England Due To Workload Management Ind vs Eng Cricket News In Marathi  sakal
क्रीडा

Jasprit Bumrah : बुमराह इंग्लंडविरुद्धच्या 'या' कसोटी सामन्यातून बाहेर? BCCI च्या सूत्राने दिली माहिती

Kiran Mahanavar

Jasprit Bumrah India vs England 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.

यादरम्यान अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला चौथ्या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. याचे मोठे कारण समोर आले आहे. धर्मशाला येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असावा, अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे आणि त्यामुळेच त्याला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात येईल.

विशाखापट्टणम कसोटी सामन्यात भारताच्या विजयात जसप्रीत बुमराहचे योगदान महत्त्वाचे होते. त्याने पहिल्या डावात 45 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावातही त्याने 46 धावांत 3 बळी मिळवले होते.

अशाप्रकारे, त्याने दोन्ही डावांत मिळून 9 विकेट घेतल्या, ही कोणत्याही कसोटी सामन्यातील त्याची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. या सामन्यात बुमराहने 150 कसोटी बळींचा आकडाही गाठला.

यानंतर बातम्या आल्या की बुमराहला तिसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते पण तसे झाले नाही. आता बातम्या येत आहेत की, अनुभवी वेगवान गोलंदाजाला तिसऱ्या सामन्याऐवजी चौथ्या सामन्यातून विश्रांती देण्यात येणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार एका सूत्राने सांगितले की, जसप्रीत बुमराहला रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. यासह धर्मशाला येथे होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी तो पूर्णपणे फ्रेश राहील. तो सामना या मालिकेतील निर्णायक सामनाही ठरू शकतो. मग बुमराहची उपस्थिती संघासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT