Jasprit Bumrah Ollie Pope Yorker Video : भारताने पहिल्या डावात 396 धावांचा डोंगर उभारल्यानंतर इंग्लंडने देखील आपला पहिला डाव आक्रमक पद्धतीने सुरू केला. मात्र भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने जुन्या चेंडूवर भेदक मारा करत पाठोपाठ दोन विकेट्स घेतल्या. त्याने जो रूटला 5 धावांवर तर ओली पोपला 24 धावांवर बाद केलं.
पहिल्या सामन्यात 196 धावा करत भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या पोलला पहिल्या डावात बुमराहने बोल्ड केले. जसप्रीत बुमराहच्या जोरदार यॉर्करसमोर स्विप अन् स्विच हिट मास्टर पोप हतबल दिसला.
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात दमदार सुरूवात केली होती. झॅक क्राऊली आणि सलामीवीर बेन डकेट यांनी 10 षटकातच 59 धावा ठोकल्या होत्या. डकेट बाद झाल्यानंतर क्राऊली आणि पोप यांनी डाव सावरला होता. त्यांनी आक्रमक अर्धशतकी भागीदारी रचली. त्यांनी इंग्लंडला बघता बघता शतक पार करून दिलं.
मात्र अक्षर पटेलने क्राऊलीला 76 धावांवर बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. मात्र अडखळती सुरूवात करणारा ओली पोप सेट होता होता. पहिल्या सामन्याप्रमाणे तो दुसऱ्या सामन्यात देखील भारतीय फिरकीपटूंवर वर्चस्व गाजवण्यास सज्ज होत होता.
मात्र रोहित शर्माने आपली रणनिती बदलत जसप्रीत बुमराहला गोलंदाजीसाठी पाचाराण केलं. त्याने जुन्या चेंडूवर चांगला रिव्हर्स स्विंग करत आधी जोर रूटला 5 धावांवर बाद केलं. त्यानंतर पोपचा सुंदर यॉर्करवर त्रिफळा उडवून पाठोपाठ दुसरा धक्का दिला.
पोप बाद झाल्यानंतर आलेल्या बेअरस्टोने आक्रमक फलंदाजी करत 28 चेंडूत 24 धावा केल्या. त्याला कर्णधार बेन स्टोक्स सावध साथ देत होता. या दोघांनी इंग्लंडला चहापानापर्यंत 155 धावांपर्यंत पोहचवले.
भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर भारताकडून आतापर्यंत कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तर जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.