Jay Shah Post After India Lost Final  ESAKAL
क्रीडा

Jay Shah : सर्व 10 सामने जिंकून फायनलमध्ये पोहचणं अन्... जय शहांनी पराभवानंतर केली भलीमोठी पोस्ट

अनिरुद्ध संकपाळ

Jay Shah Post After India Lost Final : भारताने आपल्या लीग स्टेजचे सर्व 10 चे 10 सामने जिंकून दिमाखात फायनल गाठली. मात्र फायनलमध्ये वर्ल्डकप जिंकण्याची सवय झालेल्या ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सनी मात दिल अन् वर्ल्डकप विजयाचा षटकार पूर्ण केला.

संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या भारताला फायनलमध्ये मात्र मात खावी लागली. भारताचा भारतात झालेला हा पराभव जिव्हारी लागण्या सारखाच आहे. कारण याच वर्ल्डकपमध्ये भारताला आपला 10 वर्षाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची संधी होती. मात्र भारताचं वाट पाहणं अजून काही संपलेलं नाही.

दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारताच्या पराभवानंतर भलीमोठी पोस्ट लिहिली.

जय शहा आपल्या पोस्टमध्ये लिहितात, 'जरी मेन इन ब्लू वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरले असले तरी त्यांचा वर्ल्डकपमधील प्रवास प्रेरणादायी आहे.

दमदार कामगिरी ते पराभवाची सल! प्रत्येक सामन्यात आपल्या संघाचे जिद्द, दृढता आणि स्कील सर्व पणाला लागलं होतं. सर्व 10 सामने जिंकून फायनल खेळणे.. त्यांनी खरं क्रिकेट दाखवलं. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.

संपूर्ण देश आपल्या संघाच्या पाठीशी आहे. वर्ल्डकपचे रूपांतर देशभरात उत्सवात झाले. ज्या उर्जेने, पॅशनने संपूर्ण देशाने खंबीर पाठिंबा दिला तो जबरदस्त होता.'

जय शहा पुढे लिहितात की, 'मी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचे ह्रदयापासून आभार मानतो. तुमची समर्पण वृत्ती, कष्ट आणि झुंजारपणा यामुळे स्पर्धेचा निखळ आनंद घेता आला. तुम्ही तुमच्या विजयानेच नाही तर ज्या प्रकारे तुम्ही वर्ल्डकप खेळला त्यामुळे आमचा अभिमान वाढवला.

हा वर्ल्डकपमध्ये फक्त जिंकणं महत्वाचं नव्हतं. हा वर्ल्डकप भावना, मैत्री अन् संकटातही न डगमगण्याची वृत्तीसाठी ओळखळा जाईल.

आनंद आणि न विसरणाऱ्या आठवणी दिल्याबद्दल खूप आभार. मॅन इन ब्लू हे खऱ्या अर्थाने चॅम्पियन्स आहेत. हा प्रवास थांबला अशला तरी संघाबद्दलचं प्रेम आणि अभिमान कायम राहील.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT