India vs Australia ODI Series Jay Shah : भारतात होणाऱ्या वर्ल्डकपचे वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर बीसीसीआयने भारताच्या विविध मालिकांची घोषणा करण्याचा धडाकाच लावला आहे. वेस्ट इंडीज दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर, दौऱ्यावरील संघाची घोषणा केली. त्यानंतर आयर्लंड दौऱ्याची देखील घोषणा झाली आहे. आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेची घोषणा केली.
आशिया कपनंतर भारत जास्तीजास्त वनडे सामने खेळणार आहे. आशिया कप 17 सप्टेंबरला संपण्याची शक्यता आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये मीडिया राईट्सचा लिलाव संपल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय मालिका ही नव्या मीडिया राईट्स सर्कलमध्ये खेळवली जाणार आहे.
जय शहा यांनी बुधवारी सांगितले की, 'मीडिया राईट्सचे टेंडर लवकरच बाहेर येईल. आम्ही ऑगस्टपर्यंत मीडिया राईट्सची प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आखतोय.'
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका ही आशिया कपनंतर होणार आहे. आशिया कप हा 17 सप्टेंबरला संपणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका वर्ल्डकप सराव सामन्यांच्या आधी खेळण्यात येईल. भारतासाठी ही मालिका वर्ल्डकपची प्लेईंग 11 ठरवण्यासाठी महत्वाची आहे. भारताचे वर्ल्डकप मोहिम ही 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळूनच सुरू होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याती आतापर्यंत 146 वनडे सामने झाले आहेत. यात ऑस्ट्रेलिया विजय मिळवण्यात आघाडीवर आहे. त्यांनी 82 सामने जिंकले असून भारताला फक्त 54 सामनेच जिंकता आले आहेत. या दोन्ही संघात शेवटची द्विपक्षीय मालिका ही मार्च 2023 मध्ये झाली होती. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2 - 1 अशी जिंकली होती. भारताला आता या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.