jersey sponsor byjus Title Sponsor Paytm Sponsorship Issue With BCCI  ESAKAL
क्रीडा

byjus ने बीसीसीआयचे 86 कोटी थकवले; paytm ही माघार घेण्याच्या तयारीत

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : बीसीसीआयचे प्रायोजक बायजूस (byjus) आणि पेटीएम (Paytm) यांच्यासोबत फारसचे चांगले संबंध नाहयेत अशा बातम्या येत आहे. बायजूस (byjus) हे टीम इंडियाच्या जर्सीचे प्रायोजक (Jersey Sponsor) आहेत. तर पेटीयम हे टायटल स्पॉन्सर (Title Sponsor) आहे. बायजूसने बीसीसीआयचे तब्बल 86 कोटी रूपये थवले असल्याचे वृत्त आहे तर पेटीएम देखील आपली टायटल स्पॉन्सरशिप सोडण्याच्या तयारीत आहे.

बीसीसीआयने या वर्षी एप्रिल महिन्यात बायजूस बरोबरचा करार वाढवला होता. हा करार आता 2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप पर्यंत वाढवला होता. यावर दोन्हीकडून सहमती झाली होती. या नव्या करारानुसार रक्कमेत 10 टक्के वाढ देखील करण्यात आली होती. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयच्या अॅपेक्स काऊन्सिलची गुरूवारी बैठक झाली. यानंतर बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला बायजूस बीसीसीआयचे 86.21 कोटी रूपये देणे आहे.

दरम्यान, बायजूसच्या प्रवक्त्यांनी पीटीआयला सांगितले की, आम्ही बीसीसीआय सोबतचा करार नक्की वाढवला आहे. मात्र अजून या करारावर स्वाक्षरी झालेली नाही. एकदा का स्वाक्षरी झाली की करारानुसार बीसीसीआयला त्यांची रक्कम दिली जाईल. त्यामुळे बायजूस सध्या तरी बीसीसीआयचे देणे लागत नाही.

पेटीएम देखील माघारीच्या तयारीत

पेटीएमने बीसीसीआयला आपल्या देशांतर्गत क्रिकेटसाठीचे टायटल स्पॉन्सरशिप अधिकार मास्टरकार्डला देण्याचा आग्रह केला आहे. पेटीएम आपले अधिकार दुसऱ्या एका कंपनीला हस्तांतरित करू इच्छिते. बीसीसीआय आणि पेटीएम यांच्यात 2019 ते 31 मार्च 2023 पर्यंत टायटल स्पॉन्सरशिपचा करार झाला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'पेटीएमने बीसीसीआयला स्पॉन्सरशिप दुसऱ्या कंपनीला हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. सध्या बीसीसीआय याच्यावर विचार करत आहे. पेटीएम सध्या भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांचा टायटस स्पॉन्सर आहे. हा करार पेटीएमने ऑगस्ट 2019 मध्ये वाढवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT