Ranji Trophy 2022 : कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात झारखंडने (Jharkhand Cricket Team) धावांची बरसातच केली. प्री-क्वार्टर फायनल सामन्यात झारखंडच्या फलंदाजांनी नागलँडच्या (Nagaland Cricket Team) गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. प्री क्वार्टर फायनलमध्ये झारखंडने 1000 हून अधिक धावा केल्या. झारखंड संघाने या सामन्यात क्रिकेटचा कोणता नियम तोडला नसला तरी गोलंदाजांसोबत त्यांनी खेळ भावनेचीही धुलाई केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 1000 हून अधिक धावा झाल्या तरी ते खेळायचे थांबले नाहीत. अखेर पंचांना सामना अनिर्णित घोषीत करावा लागला.
भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या सौरभ तिवारीच्या नेतृत्वाखालील झारखंड संघाने सामन्यातील दोन्ही डावात मिळून 1297 धावा कुटल्या. पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात त्यांनी 880 धावा केल्या. त्यानंतर नागालँडचा संघ 289 धावांत आटोपला. 591 धावांची आघाडी असतानाही फॉलोऑन न देता झारखंडचा संघ दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. 591 धावांच्या आघाडीसह मैदानात उतरलेल्या झारखंड संघाने पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली तेव्हा संघाने खेळ सुरुच ठेवला. अंपायर्संनी अखेर सामना अनिर्णित घोषीत केला. झारखंडने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1008 धावांच्या आघाडीसह नवा विक्रम प्रस्थापित केला.
प्लेट ग्रुपमध्ये आघाडीवर राहिलेल्या नागालँड संघाने पाच दिवसांच्या खेळात सर्वाधिक फिल्डिंग केली. त्याने 294 हून अधिक षटके टाकली. झारखंडच्या प्रशिक्षक एसएस राव यांनी संघाचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. पीटीआयशी संवाद साधताना ते म्हणाले की, रेकॉर्ड करणे हा उद्देश नव्हता. जर तसे असते तर विराट सिंह आणि सौरभ तिवारी यांनी फलंदाजी केली असती. पाटा खेळपट्टी असल्याने आम्ही तळातील फलंदाजांना संधी दिली, असेही त्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.