लंडन : टेनिसचा राजा म्हणून ओळखला जाणारा रॉजर फेडरर शुक्रवार पासून सुरू होणाऱ्या ‘लेव्हरकप’ स्पर्धेनंतर टेनिसविश्वातून निवृत्त होत आहे. तब्बल २० वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या फेडररचे टेनिसजगतातील अनेक दिग्गजांनी कौतुक केले असून आता त्यात ७ वेळा ग्रँडस्लम विजेते आणि माजी जागतिक क्रमांक १ असणारे जॉन मॅकेनरो यांचीपण भर पडली आहे. रॉजर फेडररबद्दल बोलताना जॉन मॅकेनरो म्हणाले की, ‘फेडररच्या निवृत्तीने टेनिसजगतात कधीच न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
लंडन येथे लेव्हर कपच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना जॉन मॅकेनरो म्हणाले, २० वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणाऱ्या फेडररची उणीव नक्कीच भासणार असून तो निवृत्त होत असल्यामुळे टेनिसजगतात आता कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. मी त्याला ६ वर्षांपूर्वी विम्बल्डनच्या कोर्टवर लंगडताना बघितले होते. पायाच्या दुखापतीमुळे तो जवळपास ६ महिने टेनिसपासून दूर होता. एवढी गंभीर दुखापत होऊनही पुढच्या १८ महिन्यांत त्याने ३ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून दाखवायची किमया साधली. फेडररला निवृत्तीनंतरचे उपदेश देण्याइतका मी मोठा नाही, असेही जॉन मॅकेनरो पुढे म्हणाले.
सॅम्प्रास यांच्याकडूनही स्तुती
अमेरिकेचे महान टेनिसपटू पीट सॅम्प्रास यांनी रॉजर फेडरर याची स्तुती केली आहे. ते म्हणाले, तुझ्याकडे २० ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. तू एटीपी क्रमवारीत बराच काळ नंबर वन स्थानावरही होतास. यामध्येच सर्व काही आले, असेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.