नवी दिल्ली : विराट कोहलीला एकदिवसी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Gnguly) यांनी परस्पर विरोधी वक्तव्ये केली. त्यामुळे वाद मिटण्याऐवजी तो अधिकच वाढताना दिसत आहे. याच दरम्यान, भारताचे माजी वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.
कपिल देव (Kapil Dev) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तोंडावर अशी वक्तव्ये बीसीसीआयने (BCCI) आणि कोणत्याही खेळाडूने करु नयेत. पहिल्यांदा देशाचा विचार करावा.
कपिल देव (Kapil Dev) म्हणाले, 'माध्यमांध्ये येऊन असे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे चांगले नाही. पुढे क्रिकेट दौरा आहे. तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष (BCCI President) सर्वोच्च आहेत आणि टीम इंडियाचा कर्णधार देखील महत्वाचा आहे. पण, सार्वजनिकरित्या एकमेकांवर अशी टीका करणे योग्य नाही. याठिकाणी सौरभ असो वा विराट तुम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवली पाहिजे. तुम्ही देशाचा विचार केला तर बरं होईल.'
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने (Sourav Gnguly) मध्यंतरी विराट कोहलीला आपण टी 20 संघाचे कर्णधारपद न सोडण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले होते. बीसीसीआय टी 20 आणि एकदिवसीय संघासाठी एकच कर्णधार असावा यासाठी आग्रही आहे असेही ते म्हणाले होते.
मात्र काल दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या (India Tour Of South Africa) पार्श्वभूमीवर विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली होती. त्यात विराट कोहलीने (Virat Kohli) ज्यावेळी त्याने टी 20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी बीसीसीआयकडून कोणीही तू कर्णधारपद सोडू नकोस असे म्हणाले नाही असे सांगितले. याचबरोबर मला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्याची माहिती निर्णय घोषित करण्याच्या आधी दीड तास देण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.