राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर पोहचली आहे. या दौऱ्यामुळे राहुल द्रविड भविष्यात भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धूरा सांभाळणार का? अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झालीये. टी-20 वर्ल्ड कपनंतर रवि शास्त्री यांचे कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात येणार असून त्यानंतर राहुल द्रविड टीम इंडियाचे नियमित कोच होतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे. या मुद्यावर भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांनी प्रतिक्रिया दिलीये.
सध्याच्या घडीला या विषयावर अधिक खोलात जाण्याची गरज वाटत नाही. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ कशी कामगिरी करतोय हे अगोदर पाहूयात. जर नव्या कोचपदासाठी प्लॅनिंग सुरु असेल तर त्यात वावगे काहीच नाही, असेही कपिल पाजी यावेळी म्हणाले. जर रवि शास्त्री उत्तम काम करत असतील तर त्यांना हटवण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. या गोष्टी येणारा काळच ठरवेल. या मुद्यावरील अनावश्यक चर्चा खेळाडू आणि कोच दोन्हीसाठीही घातक ठरेल, असे मतही कपिल देव यांनी मांडले आहे.
कपिल देव यांच्याकडून युवा खेळाडूंच कौतुक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटीसाठी वेगळा आणि मर्यादित षटकांसाठी श्रीलंका दौऱ्यासाठी वेगळा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. युवा खेळाडूंनी आपल्यातील क्षमता सिद्ध केलीये. त्यामुळे ब्लू कॅपचे ते हकदार आहेत, असे मत व्यक्त करत नव्या दमाच्या खेळाडूंचे कपिल पाजींनी कौतुक केले. सध्याच्या घडीला खूप क्रिकेट होत आहे, याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.
द्रविडच्या नावाच्या चर्चेमागचं कारण
रवि शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. पण आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत टीम इंडिया अपयशी ठरलीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत रवि शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली टीमच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले. इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये गाशा गुंडाळावा लागला होता. दरम्यान त्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर द्रविडला टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदी नियुक्त करावे, अशी मागणी जोर धरताना दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.