नवी दिल्ली- आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. १० हजार मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत भारतीय खेळाडूंनी फायनलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहून रौप्य आणि कास्य पदकं नावावर केली आहेत. कार्तिक कुमार याने रौप्य तर गुलवीर सिंगने कास्य पदकावर नाव कोरले.
१० हजार मीटर शर्यतीत कार्तिक कुमारने 28:15.38s वेळेची नोंद करत रौप्य पदक नावावर केले. दुसरीकडे, गुलवीर सिंगने 28:17.21s वेळेची नोंद करत तिसऱ्या स्थानी राहून कास्य पदक कमावले. त्यामुळे या शर्यतीत दोन भारतीयांनी पदकं नावावर केली. चीनच्या हांगझोऊ येथे आशियाई स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू कमाल करत असून पदकांच्या संख्येत चौथ्या क्रमांकावर आहेत.
विशेष म्हणजे १०० मीटरची स्पर्धा शिल्लक असताना भारताच्या दोन्ही खेळाडूंनी आघाडी घेतली. आणि पदकं निश्चित केले. सुवर्ण पदकं बहारिनच्या खेळाडूने नावावर केले. बिरहानू रेमातेव बालेव (Birhanu Yemataw Balew) याने 28:13.62 वेळ घेत सुवर्ण पदकावर नाव कोरले. आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आशियाई स्पर्धत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरुच आहे. मेन्स स्क्वाश स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत झाली, पण भारताने बाजी मारली. भारताने 2-1 फरकाने पाकिस्तानवर मात केली. त्यामुळे स्क्वाश स्पर्धेचे सुवर्ण पद भारताच्या खात्यावर जमा झाले. (Latest Sports News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.