आयपीएलच्या 15 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. साखळी सामन्यांमध्ये राजस्थानने 9 सामने जिंकले. साखळी सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्स विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरी गाठली. मात्र आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्स या संघाने विजेतेपदाच्या लढतीत त्याचा पराभव केला.(kichcha sudeep gets signed bat from jos buttler)
राजस्थानसाठी या हंगामात बटलरने सर्वाधिक धावा केल्या. अभिनेता किच्चा सुदीपला राजस्थान रॉयल्सकडून एक खास भेट मिळाली आहे. रॉयल्सने अभिनेता किच्चा सुदीपला ऑरेंज कॅप विजेत्या जोस बटलरने ऑटोग्राफ केलेली बॅट गिफ्ट केले आहे. त्याने खास गिफ्टसाठी राजस्थान रॉयल्स आणि बटलरचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ मध्ये त्याने @josbuttler ला धन्यवाद केले आहे.
जॉस बटलरने यंदाच्या आयपीएल हंगामात धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. बटलरने चार शतके ठोकत हंगामातील 17 सामन्यात 863 धावा केल्या. त्याच्या या तुफानी बॅटिंगमुळे तो आता विराट कोहलीचा 2016 चा 973 धावांचा विक्रम मोडतो की काय असे वाटू लागले होते. जॉस बटलरने हंगामात सर्वाधिक शतकांचा विराटच्या विक्रमाशी बरोबरी केली. मात्र विराटचा धावांचा विक्रम मात्र कायम राहिला.
राजस्थान रॉयल्सच्या संघाने शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये विजेतेपद पटकावले होते. सॅमसनला त्याची बरोबरी करायला आवडेल असत पण राजस्थान रॉयल्सचे दुसऱ्यांदा IPL विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. कर्णधार हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे गुजरात टायटन्सने त्यांच्या पहिल्या सत्रात इंडियन प्रीमियर लीग (IPL) फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सवर 7 गडी राखून एकतर्फी विजय मिळवून जेतेपद पटकावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.