KL Rahul  esakal
क्रीडा

KL Rahul : केएल राहुलने सेंच्युरियनवर इतिहास रचला; डबल धमाका करणारा ठरला पहिला फलंदाज

अनिरुद्ध संकपाळ

KL Rahul Test Cricket Record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताचा मधल्या फळीतील फलंदाजी केएल राहुलने झुंजार शतकी खेळी केली. या शतकी खेळीच्या जोरावरच भारताने सेंच्युरियनच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर 245 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेत केएल राहुलचे हे दुसरे शकत आहे.

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला डाव 8 बाद 208 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. केएला राहुल दुसऱ्या दिवशी खेळायला आला त्यावेळी तो 70 दावांवर होता. भारताच्या हातात फक्त दोन विकेट्स होत्या. त्यामुळे केएल राहुलने आक्रमक फलंदाजी करत धावफलक हालता ठेवला.

दरम्यान केएल राहुल शतकाच्या जवळ पोहचला होता. मात्र सिराज बाद झाला. त्यानंतर केएलने प्रसिद्ध कृष्णाला साथीला घेत आपले शतक पूर्ण केलं. त्याने षटकार मारून शतक पूर्ण केलं. याचबरोबर त्याने एक विक्रम देखील आपल्या नावावर केला.

केएल राहुल हा पाहुण्या संघांमधील सेंच्युरियनवर दोन शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने सेंच्युरियनवर पहिले शतक हे 2021 मध्ये ठोकले होते. त्याने सलामीला येत 123 धावांची दमदार खेळी केली होती. याचबरोबर केएल राहुलने अजून एक माईल स्टोन पार केला आहे. सेना (SENA) देशात शतक ठोकणारा तो ऋषभ पंतनंतर दुसरा विकेटकिपर ठरला आहे.

केएल राहुलच्या 101 धावांच्या खेळी मुळे भारतीय संघ 245 धावांपर्यंत पोहचू शकला. केएल राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला त्यावेळी भारताची अवस्था 5 बाद 107 धावा अशी झाली होती.

कसोटी क्रिकेटमध्ये केएल आता मधल्या फळीत फळंदाजी करतोय ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

SCROLL FOR NEXT