kl rahul 3rd test cricket match unavailable due to injury devdutt padikkal selection Sakal
क्रीडा

Ind vs Eng 3rd Test : राहुल तिसऱ्या कसोटीसाठीही अनुपलब्ध, पडिक्कलची निवड; मधली फळी आता अननुभवी

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला मैदानात उतरण्यापूर्वीच धक्के बसत आहेत. विराट कोहलीची अनुपलब्धता, त्यातच श्रेयस अय्यरला दिलेला डच्चू, त्यामुळे के. एल. राहुलवर मधल्या फळीची जबाबदारी येणार होती; परंतु तोही तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

राजकोट : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला मैदानात उतरण्यापूर्वीच धक्के बसत आहेत. विराट कोहलीची अनुपलब्धता, त्यातच श्रेयस अय्यरला दिलेला डच्चू, त्यामुळे के. एल. राहुलवर मधल्या फळीची जबाबदारी येणार होती; परंतु तोही तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला आहे.

मांडीच्या दुखापतीमुळे राहुल दुसऱ्या कसोटीत खेळला नव्हता. पहिल्या कसोटीत त्याला ही दुखापत झाली होती. आता जवळपास १५ दिवस झाले तरी तो तंदुरुस्त झालेला नाही.

राहुल काही दिवसांपासून बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीसाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याची रवींद्र जडेजासाह तिसऱ्या कसोटीसाठी निवडही करण्यात आली होती; परंतु तंदुरुस्तीनंतर त्यांचे अंतिम संघातील स्थान निश्चित होणार होते.

राहुलने फलंदाजीचा हलका सराव सुरू केल्याचे सांगितले जात होते. आता तिसरा कसोटी सामना तीन दिवसांवर आलेला असताना राहुल तंदुरुस्त नसल्याचे सांगण्यात आले.

राहुलच्या ठिकाणी कर्नाटकचा फलंदाज देवदत्त पडिक्कलची निवड करण्यात आली. मात्र तिसऱ्या कसोटीत सर्फराझ खानला पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या कसोटीतून रजत पाटीदारने पदार्पण केले होते. अशा प्रकारे तिसऱ्या कसोटीत भारताची मधली फळी एकदमच नवखी असणार आहे.

इंग्लंड संघही राजकोटमध्ये

विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना चौथ्याच दिवशी संपल्यानंतर तिसऱ्या कसोटीमध्ये नऊ दिवसांची विश्रांती असल्यामुळे इंग्लंड संघाने भारतात राहाण्याऐवजी पुन्हा अबुधाबी येथे जाणे पसंत केले. सोमवारी त्यांचा संघ राजकोटमध्ये दाखल झाला.

पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेसाठी भारतात येण्याअगोदर इंग्लंडचा संघ तीन दिवस अबुधाबीत सराव करत होता. भारतीय फिरकी गोलंदाजी निष्प्रभ करण्यासाठी येथे त्यांच्या फलंदाजांनी स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचा भरपूर सराव केला होता.

इंग्लंडचा संघ सोमवारी सायंकाळी राजकोटमध्ये दाखल झालेला असला तरी ते उद्या मंगळवारपासून सराव सुरू करणार आहेत. त्यांचा अनुभवी फिरकी गोलंदाज जॅक लीच हा सुद्धा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेला आहे, मात्र त्यांनी अजून त्याचा बदली खेळाडू निवडलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT