KL Rahul : भारताचा उपकर्णधार म्हणून शेखी मिरवणारा हार्दिक पांड्या हा खिलाडूवृत्तीच्या बाबतीत कसा कुजका कांदा ठरला होता. त्याने तिलक वर्माचे अर्धशतक पूर्ण होऊ दिले नव्हते. षटकार मारून त्याला अर्धशतकापासून वंचित ठेवले. गेल्या आठवड्यात केएल राहुलच्या शतकाची देखील संधी हार्दिकमुळे हुकली होती.
मात्र याच हार्दिकला आता केएल राहुलने खिलाडू वृत्ती काय असते हे दाखवून दिले. आजच्या सामन्यात विराट कोहली आपल्या शतकाच्या जवळ होता. मात्र धावफलकावर धावा फार कमी होत्या. केएल राहुलने विराटच्या शतकासाठी स्वतः मोठे फटके मारणे टाळले अन् विराटला जास्ताजास्त स्ट्राईक दिले. यामुळेच विराट कोहली यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले पहिले शतक ठोकू शकला.
विराट कोहलीने आज 39 व्या षटकात आपल्या 26 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. या माईल स्टोननंतर भारताला विजयासाठी 19 तर विराट कोहलीच्या यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिल्या शतकासाठी देखील 19 धावांचीच गरज होती. विराटने 40 व्या षटकाची सुरूवात चौकाराने केली. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र केएल राहुलने त्याला थांबवत संपूर्ण षटक खेळून शतक पूर्ण करण्याचा इशारा केला. यानंतर विराटने चौथ्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. 41 व्या षटकात देखील राहुलने स्ट्राईक आपल्याकडे घेतले नाही. विराटला तीनवेळा दोन धावा करण्यास मदतच केली.
42 व्या षटकात भारताला विजयासाठी 2 तर विराट कोहलीच्या शतकासाठी 3 धावांची गरज होती. अखेर विराटने तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत शतकही पूर्ण केलं अन् भारताच्या सलग चौथ्या विजयावर देखील शिक्कामोर्तब केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.