kl rahul out from t20i series vs south africa SAKAL
क्रीडा

केएल राहुल दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून बाहेर; ऋषभ पंत कर्णधारपदी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Kiran Mahanavar

kl Rahul Out From T-20 Series Vs South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार केएल राहुलच्या रूपात टीम इंडियाला हा झटका बसला आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हे दुखापतींमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T-20 मालिकेतून बाहेर पडला आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली होती, मात्र दुखापतीमुळे तो यापुढे मालिकेचा भाग होणार नाही. केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी यष्टीरक्षक ऋषभ पंत कर्णधार निवड केली आहे. त्याचबरोबर नुकतेच गुजरात टायटन्सला आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

केएल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतीमुळे या मालिकेचा भाग नसल्याचं बीसीसीआयने ट्विट केलं आहे. कर्णधार केएल राहुल उजव्या मांडीला दुखापत झाली आहे, तर कुलदीप यादवला फलंदाजी करताना उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे टी-20 मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

भारतीय T-20 संघ

ऋषभ पंतकप्तान (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT