KL Rahul Twitter
क्रीडा

आफ्रिकेत सेंच्युरी ठोकणारा KL राहुल ठरला दुसरा सलामीवीर

सुशांत जाधव

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उप-कर्णधाराची धुरा खांद्यावर पडलेल्या लोकेश राहुलनं (KL Rahul) सेंच्युरीयनच्या (SuperSport Park, Centurion ) पहिल्या कसोटीत (South Africa vs India, 1st Test) शतकी धमाका केला. दक्षिण आफ्रिकेत शतकी खेळी करणारा भारताचा तो दुसरा सलामीवीर आहे. यापूर्वी वासीम जाफरने (Wasim Jaffer) अशी कामगिरी करुन दाखवली होती.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलनं मयांकच्या साथीने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) 60 धावा करुन परतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या पुजाराला (Cheteshwar Pujara) एनिग्डीनं (Lungi Ngidi) खातेही उघडू दिले नाही. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli ) 35 धावांची भर घालून तंबूत परतला.

त्यानंतर दुसऱ्या बाजूनं लोकेश राहुलनं शतकाला गवसणी घातली. 41 व्या कसोटी सामन्यातील लोकेश राहुलचे हे 7 वे कसोटी शतक आहे. दक्षिण आफ्रिकेत त्याला चांगला स्टार्ट मिळाला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी लोकेश राहुलसह अजिंक्य रहाणे लयीत खेळत होता. भारतीय राहुलच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेर 3 बाद 272 धावा केल्या आहेत. लोकेश राहुल 122 धावांवर नाबाद खेळत होता. दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणे 81 चेंडूत 40 धावांवर खेळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT