Kolhapur Sater Sam Swant Sccess Story.gif 
क्रीडा

सोहमच्या यशाची कथा एकदा वाचाच

युवराज इंगवले

मुळातच एखाद्या खेळाची आवड आणि त्यावरची निष्ठा हे त्याला नेहमीच चांगली कामगिरी करण्यास प्रेरित करत असते. राष्ट्रीय स्केटिंगपटू सोहम सावंत हे त्यातीलच एक उत्तम उदाहरण आहे. दुसरीत शिकत असतानाच सोहमला स्केटिंग करण्याची आवड निर्माण झाली आणि बघता बघता त्याने राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. अर्थात त्याला पाठबळ होते ते त्याचे वडील विक्रम सावंत यांचे. त्यांनी सोहमला स्केटिंगला प्रेरित केले आणि सोहमनेही आपल्या वडिलांचा विश्‍वास सार्थ ठरविला. तसेच सोहमला घडविण्यात प्रशिक्षक सचिन इंगवले यांचाही मोलाचा वाटा आहे. एक आश्‍वासक स्केटिंगपटू म्हणून त्याच्याकडे आता पाहिले जाते.  

जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर सोहमने राष्ट्रीय स्तरावर झेप मारली आहे. बेळगाव येथे झालेल्या ऑल इंडिया स्केटिंग स्पर्धेत सोहमने पहिल्यांदा आपला सहभाग नोंदवला. त्यात त्याने प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कारकिर्दीची घौडदोड सुरू केली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने अनेक राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत महाराष्ट्राचे किंबहुना कोल्हापूरचे नाव देशपातळीवर पोहचविले आहे. नुकत्याच झालेल्या सकाळ माध्यम समूह प्रस्तुत मॅप्रो- स्कूलिंपिक्‍स स्पर्धेत भाग घेऊन दमदार कामगिरी केली आहे. 

बेळगावच्या स्पर्धेनंतर सोहमने गोवा, मुंबई, नाशिक, पुणे आणि अन्य ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत पदकांची लयलूट केली आहे. त्याने आतापर्यंत ४५ पदके आणि ३५ ट्रॉफीज मिळवल्या आहेत. सध्या सोहम नववीत शिकत आहे. अभ्यासातही तो हुशार आहे. स्केटिंग स्पर्धेत सहभाग नोंदवत असताना त्याने कधीच अभ्यासाकडेही दुर्लक्ष केलेले नाही. रोज सकाळी किमान चार तास तरी तो स्केटिंगचा सराव करत असतो. हे करत असताना सोहम आपल्या फिटनेसकडेही चांगले लक्ष देतो. दूध आणि अंडी यांना तो आपल्या आहारात प्राधान्य देतो. तेलकट खाणे तो टाळतोच. स्केटिंग करत असताना त्याचा व्यायाम आपसूक होतोच. तरीही तो रोज किमान एक तास व्यायाम करतोच. अभ्यास आणि आपल्या खेळाचे संतुलन त्याने उत्तम प्रकारे साधले आहे. अगदी कमी वयात मिळवलेल्या त्याच्या यशाबद्दल त्याच्या पालकांना कौतुक तर आहेच, त्याचबरोबर त्याचे प्रशिक्षक आणि शिक्षकही त्याला नेहमीच प्रोत्साहित करत असतात. ही तर सुरवात असून भविष्यात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करावयाचे असून त्यासाठी कोणत्याही कष्टाची तयारी असल्याचे सोहमने सांगितले. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्याला आतापर्यंत दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविले आहे. तो नक्कीच आपल्या यशाचा आलेख चढता ठेवेल, अशी अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाही!

सोहमने मिळवलेले पुरस्कार

 सुवर्ण लक्ष्य राष्ट्रीय पुरस्कार

मास्टर चंदिराम क्रीडा पुरस्कार.

सोहमच्या विक्रमांची नोंद

 गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड.

आशिया बुक ऑफ रेकॉर्ड.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड.

टिप्स तंतोतंत पाळतो

सोहम अतिशय कष्टाळू स्केटिंगपटू आहे, हे त्याने आतापर्यंत मिळवलेल्या यशावरून दिसून आले आहे. तो शिस्तबद्ध आहेच, त्याचबरोबर मी दिलेल्या टिप्स तो तंतोतंत पाळतो. 
- सचिन इंगवले, प्रशिक्षक.

विश्‍वास सार्थ ठरविला

सोहमला लहानपणापासूनच स्केटिंगची आवड होती. त्याची आवड लक्षात घेऊन त्याला स्केटिंगसाठी प्रोत्साहित केले. त्याने माझा विश्‍वास सार्थ ठरविला, याचा वडील म्हणून मला सार्थ अभिमान आहे.
-विक्रम सावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT