Swapnil Kusale  Esakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : खाशाबांचा वारस कोल्हापुरातच जन्मला! ऑलिंपिक गाजवणारा दुसरा कोल्हापूरकर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पॅरिस ऑलिंपिकमध्ये ५० मीटर थ्री पोझिशन्समध्ये कोल्हापूर (कांबळवाडी, राधानगरी)च्या स्वप्नील कुसाळेने ४५१.४ गुणांसह ब्राँझपदकाला गवसणी घातली. अशी कामगिरी करणारा तो दुसरा कोल्हापूरकर ठरला.

यापूर्वी खाशाबा जाधव यांनी कुस्तीत हेलिंसिकी येथे १९५२ साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ब्राँझपदक पटकावले होते. खाशाबा मूळचे कराड (गोळेश्‍वर)चे जरी असले तरी शिक्षण, कुस्तीची हयात कोल्हापुरात गेली. त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी हे दुसरे ऑलिंपिक पदक ठरले.

स्वप्नीलचा प्रवास थक्क करणारा आहे. त्याने सातवीत असताना गगन नारंग ऑलिंपिक स्पर्धेत खेळत असताना दुरचित्रवाणीवर त्याचा खेळ पाहण्यासाठी शाळा चुकविली होती. हाच धागा पकडून वडिलांनी त्याचा खेळाकडे असणारा ओढा ओळखला.

त्यामुळे त्यांनी क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी अर्ज केला. त्याला प्रथम सातारा येथे प्रवेश मिळाला. एक वर्षानंतर खेळ निश्‍चितीकरणात त्याने नेमबाजी खेळ निवडला. त्याला पुणे, नाशिक, कोल्हापूर असे तीन पर्याय होते, मात्र क्रीडा प्रबोधिनीने त्याला नाशिक दिले. त्याने २००९ ते २०१२-१३ पर्यंत नाशिक मिलटरी स्कूलमधून शालेय शिक्षण आणि क्रीडा प्रबोधिनीत नेमबाजी सराव केला.

तुघलकबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने ऑलिंपियन गगन नारंग, चेन सिंग यांना मागे टाकले. त्याने अशीच कामगिरी तिरुवनंतपुरम येथे झालेल्या ६१ व्या राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेतही केली. कैरोत २०२२ साली विश्‍वचषक स्पर्धेत त्याने चौथा क्रमांक मिळवत ऑलिंपिकवारीचे पहिले तिकीट घेतले. बाकूमध्ये २०२३ साली त्याने मिश्रमध्ये सुवर्ण घेतले.

माझ्या वडिलांनी १९५२ साली स्वतंत्र भारतासाठी पहिले ऑलिंपिक पदक कुस्तीत जिंकले. अशी कामगिरी कोल्हापुरातील कांबळवाडीच्या स्वप्नीलने करून दाखविली. खऱ्या अर्थाने तो माझ्या वडिलांचा वारसदार ठरला. त्याच्या वडिलांशी बोलतानाही हीच अपेक्षा व्यक्त केली. त्याने आणखी प्रगती करून २०२८ च्या ऑलिंपिकमध्ये सुवर्ण वेध घ्यावा. हीच माझ्यासह जाधव कुटुंबीयांची शुभेच्छा राहील.

-रणजित जाधव, खाशाबा जाधव यांचे चिरंजीव

अनपेक्षित यश नव्हे तर कष्टाचे चीज झाले

स्वप्नीलची ऑलिंपिक, राष्ट्रकुल महत्त्वाच्या निवड चाचणीत पॉईंट वनने अगदी कमी फरकाने निवड झाली नव्हती. महाराष्ट्राकडून पुरुष नेमबाज हवा होता. तो इतके दिवस तग धरून चिकाटीने सराव करीत होता. त्याचे फळ आज त्याला मिळाले. गेली अनेक वर्षे तो कष्ट घेत आहे. जगासाठी त्याचे यश अनपेक्षित असेल, मात्र तेजस्विनी दिदी व मला अपेक्षित होते.

- राही सरनोबत, ऑलिंपियन नेमबाज

महाराष्ट्राला मोठं पदक मिळाले

कोल्हापूरला खाशाबा सरांनंतर मिळालेले पहिले पदक स्वप्नीलने मिळवले. पदकांचा दुष्काळ संपवला. त्याने पदकाची वाचा फोडली. आता महाराष्ट्राला पदके मिळतील. त्याने शेवटच्या क्षणापर्यंत करून दाखविले. त्याने पदक जिंकल्यानंतर मी फार वेळ रडले. कारण पदक जिंकले हे ॲमेझिंग होते.

- तेजस्विनी सावंत, आंतरराष्ट्रीय नेमबाज

शांत राहून पदक जिंकले.

त्याची देहबोली आत्मविश्वासपूर्वक होती. भले तो घाबरलेला, पण त्याने करून दाखविले. थोडक्यात त्याचा कमबॅक होता. प्रोन स्ट्रॉग पाईंट आहे. अंतिम फेरीत चीन आणि चेक प्रजासत्ताकाचा विश्वविजेता होता. त्यांची खराब कामगिरी त्याच्या पथ्यावर पडली. प्रतिस्पर्ध्यांची नैराश्‍यता त्याने जाणून पॉझिटिव्ह राहून हे पदक जिंकले.

- शाहू माने, युथ ऑलिंपियन नेमबाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT